महिला दिनानिमित्त ऑनलाइन प्रश्नमंजूषा..

0
172

नंदुरबार :११/३/२०२३

महिला दिनाचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सर्व नागरिकांसाठी प्रश्नमंजूषा आयोजित केली आहे. ही प्रश्नमंजूषा स्त्री, पुरुष आणि पारलिंगी व्यक्ती यांच्यासाठी आहे.

तरी या प्रश्नमंजूषेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

या प्रश्नमंजूषेत स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांनी विवाहानंतर नाव बदलावे की नाही, पारलिंगी महिला (Transwoman), पारलिंगी पुरुष (Transman) या घटकासंबंधी प्रश्न विचारण्यात आले आहेत.

या प्रश्नांच्या उत्तरांसाठी केवळ हो/नाही पर्याय आहे.

या प्रश्नमंजूषेत १४ मार्च २०२३ पर्यंत https://forms.gle/SsnJYKACXzNkmQr67 या लिंकद्वारे सहभागी होता येणार आहे.

या प्रश्न मंजुषेत सर्व सहभागींना ई-मेलद्वारे प्रमाणपत्र देण्यात येईल.

याबाबत काही अडचण आल्यास प्रणव सलगरकर यांच्या ८६६९०५८३२५ या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा, असेही देशपांडे यांनी कळविले आहे.

प्रविण चव्हाण एम. डी टी. व्ही न्यूज नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here