२४ बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश
नंदुरबार :- धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील सिसा गावात आज रोजी ( दिनांक ७ जून २०२३ ) रोजी एका अल्पवयीन मुलीचा अस्तंबा येथील तरुणाशी होणारा साखरपुडा तसेच कुंडल ( ता.धडगाव ) येथे एका अल्पवयीन मुलीचा खामला ( ता. धडगांव ) येथील तरुणासोबत आज रोजी होणारा बालविवाह थांबविण्यात नंदुरबार पोलिसांना यश आले आहे. नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या “ऑपरेशन अक्षता” मोहिमेंतर्गत गेल्या ३ महिन्याच्या काळात आतापर्यंत २४ पेक्षा जास्त बालविवाह पोलिसांनी रोखले आहेत.
बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या “ऑपरेशन अक्षता” या उपक्रमासाठी ९०२२४५५४१४ हा हेल्पलाईन नंबर जिल्हा पोलीस दलाकडून सुरु करण्यात आला आलेला आहे. नागरिकांना बैठकांमध्ये कोणत्याही गावात बालविवाह होत असल्यास त्याबाबत हेल्पलाईन नंबरवर तात्काळ संपर्क करुन माहिती देणेबाबत आवाहन करण्यात आले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दिनांक ७ जून रोजी “ऑपरेशन अक्षता” या उपक्रमासाठी सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरवर एका सुज्ञ नागरिकाने फोनकरुन माहिती दिली की, धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील सिसा गावात आज रोजी एका अल्पवयीन मुलीचा अस्तंबा येथील तरुणाशी साखरपुडा होणार असून विवाहाची तारीख निश्चित केली जाणार आहे. सदरची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांना कळवून सिसा येथील साखरपुडा कार्यक्रम थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांना कायदेशीर बाबी समजावून सांगून पालकांचे समुपदेशन करणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार पोलीस निरीक्षक पठाण यांनी धडगांव पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने तात्काळ माहिती घेत सिसा गावातील एका अल्पवयीन मुलीचा अस्तंबा गावातील एका तरुणासोबत आज ७ जून रोजी साखरपुडा कार्यक्रम अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलगी, तिचे कुटुंबीय व गावातील नागरिक तसेच वर मुलगा व त्याच्या कुटुंबीयांना कायदेशीर बाबी समजावून सांगून होवू घातलेला बालविवाह रोखला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दरम्यान, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांना कळविले की, धडगांव पोलीस ठाणे हद्दीतीलच कुंडल येथे देखील एका अल्पवयीन मुलीचा खामला ( ता. धडगांव ) येथील तरुणासोबत आज ( दिनांक ७ जून ) रोजी बालविवाह होणार आहे. सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांना कायदेशीर बाबी समजावून सांगून पालकांचे समुपदेशन करणेबाबत त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांनी तात्काळ कुंडल येथे जावून माहिती काढली असता तेथे एका अल्पवयीन मुलीचा खामला गावातील एका तरुणासोबत आज रोजी बालविवाह होणार होता. परंतु त्यापूर्वीच श्री. पठाण व त्यांच्या पथकाने अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलगी, तिचे कुटुंबीय व गावातील नागरिक तसेच वर मुलगा व त्याच्या कुटुंबीयांना कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांना बालविवाह करण्यापासून परावृत्त केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सिसा व कुंडल येथील दोन्ही अल्पवयीन मुलींचे व मुलांचे पालक व गावातील नागरिकांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले. तसेच सिसा व कुंडल येथे कार्यक्रमाला उपस्थित असलेले नातेवाईक व नागरिकांना बालविवाहाबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन जनजागृती केली. अल्पवयीन मुलींच्या व वर मुलांच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली. दोन्ही अल्पवयीन मुली व वर मुलांच्या पालकांना धडगांव पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण, पोलीस उप निरीक्षक प्रवीण महाले, पोलीस हवालदार स्वप्नील गोसावी, पुष्पेंद्र कोळी, पोलीस अंमलदार विश्वजीत चव्हाण, सिसा गावाचे पोलीस पाटील पंडित पाडवी व कुंडल गावाचे पोलीस पाटील हरीष पाडवी यांनी केली आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.