नगरदेवळा येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन…!

0
182

भडगाव :२४/२/२०२३

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नगरदेवळा येथील विठ्ठल मंदिरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या धडाडीच्या नेत्या सौ.वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी नि:शुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते.

प्रथमतः दीपप्रज्जवलाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे ऋण आपल्यावर असते ते सामाजिक ऋण फेडण्याच्या उद्देशाने आपली सामाजिक बांधिलकी जोपासत सौ. वैशाली सुर्यवंशी यांनी नगरदेवळा तसेच पंचक्रोशीतील ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे.

अशा गरजू लोकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून सुमारे 350 रुग्णांची तपासणी जळगाव येथील नेत्रचिकित्सक डॉ. योगेश चायपाय यांच्याकडून करून घेतली.

त्यातील जवळपास 65 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध कांताई नेत्र चिकित्सालय या ठिकाणी पाठविण्यात आले.

रुग्णांची तपासणी,जळगाव येथे येण्या – जाण्याचा तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च सौ. वैशाली सुर्यवंशी करीत आहेत.
याप्रसंगी शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख श्री. रमेशजी बाफना, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री. संदीप जैन, सौ.अलका भांडारकर, श्री मुन्ना भांडारकर, श्री.योगेश समारे,अविनाश पाटील विनोद राऊत,योगेश सुमारे,अविनाश पाटील विनोद राऊळ जुब्बू शेख, मुकेश राजपूत, सीमा महाजन, विकी जाधव, रवींद्र महाजन, दिलीप परदेशी,अन्नू शेख, दत्तू भोई तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सतीश पाटील भडगाव प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here