Palghar News- पालघर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्धापन दिनाचे आयोजन अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन गेल्या 138 वर्षापासून प्रत्येक तालुक्यात परंपरेनुसार तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने गुरुवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी पालघर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेशजी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा 138 वा वर्धापन दिन जिल्हा पालघर येथील काँग्रेस भवन येथे साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील हे होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या 138 व्या वर्धापन दिनानिमित्ताने उपस्थित कार्यकर्त्यांना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविश राऊत , जेष्ठ नेते सिकंदर शेख , महाराष्ट्र प्रदेश महिला पदाधिकारी संगीताताई धोंडे , वक्ता ऋषी सावंत , वरिष्ठ उपाध्यक्ष मोइज शेख यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पालघर जिल्हा समन्वय श्री संदीपजी मेने यांनी केले. तर कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा सरचिटणीस मनोज दांडेकर यांनी केले.
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, देशात प्रचंड वाढलेली महागाई , बेरोजगारी यांनी देशातील जनतेत काहूर माजले आहे. शेतकरी , कष्टकरी , मजदूर , कामगार संकटात सापडला आहे. जीवनावश्यक वस्तू व पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. केंद्रातील विद्यमान सत्याधरी पक्ष यांच्या मनमानी कारभाराने जनता हैराण परेशान झाली आहे. हम करे सो कायदा प्रमाणे सरकार वागत आहे. ईडी , सीबीआय , केंद्रीय तपास यंत्रणा यांचा गैरवापर होताना तसेच दबावतंत्राचा वापर करून कशी राज्य सरकारे पडली जातात व भ्रष्ट आमदार खासदार बीजेपी सरकारमध्ये सामील होताच कसे निर्दोष निष्कलंक होतात हे देशातील जनतेने सर्व पाहिले आहे.
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
- Nandurbar News : नंदुरबार शहरात पोलिसांची दारू प्रकरणी यशस्वी कारवाई…!
- Nandurbar News : महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टे विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा..!
2014 पूर्वी 609 क्रमांकावर असलेला अदानी 2014 नंतर बीजेपी सरकारच्या काळात सर्वात श्रीमंताच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोचला आहे. मणिपूर सारख्या घटनेने माणुसकीला कालीमा फासण्याचे काम या बीजेपी सरकारच्या काळात घडले आहे. सरकारी कारखाने विकण्याचे घाट घातले असुन मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटेशन केले जात आहे. केंद्रातील विद्यमान सरकारने 146 खासदारांचे निलंबन करून लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांना संसदीय व्यवस्थेतून दूर केले आहे.
परिणामी जनतेत प्रचंड असंतोष असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जेष्ठ नेते , खासदार आदरणीय राहुलजी गांधी पुन्हा एकदा जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने दुसऱ्यांदा भारत जनजागरण यात्रेची सुरुवात करत आहे. करिता पक्षाच्या 138 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यातून ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाओ , ईव्हीएम हटाव देश बचाओ , ईव्हीएम हटाव सविधान बचाओ चा नारा देण्यात आला.
(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रतिनिधी सुधिर जैन , प्रदेश प्रतिनिधी महेन्द्र सिंग , वरीष्ठ नेते सुरेंद्र शेट्टी , वरिष्ठ उपाध्यक्ष अरशद खान , जिल्हा उपाध्यक्ष भरत महाले , बिंबेश जाधव, रोहित चौधरी , ॲड. अजिंक्य म्हस्के, सलमान खान, मनोज पाटील , अल्पसंख्यांक विभाग पालघर जिल्हाध्यक्ष आसिफ मेमन , बच्चा भाई ठाकूर , शैलेश ठाकूर , राजेश शुक्ला, चिराग देसाई , मीडिया सेलचे जिल्हा अध्यक्ष रोशन पाटील , सहकार सेलचे पालघर जिल्हा अध्यक्ष वासुदेव पाटील , खरेदी विक्री सेलचे अध्यक्ष नरोत्तम पाटील , ग्राहक संरक्षण सेल जिल्हा अध्यक्षा सुनंदा बेलकर , मीनाताई धोंदडे , माजी महिला जिल्हा अध्यक्षा मनीषा सावे, वनिता जाधव ,पालघर तालुका महिला अध्यक्ष भावसार मॅडम , पालघर तालुका सरचिटणीस किरण पाटील , पालघर शहर अध्यक्ष मनोहर दांडेकर, असद चूनावाला, सुधीर भाऊ मोगरे. प्रफूल मोगरे ,गुलजार भाई शेख , तौफिक एन् शेख ( दिव्यांग) , सिकंदर जमादार , प्रकाश पटनाईक , रसिक भाई , भानुशाली , नन्नुभाई शुक्ला ,प्रकाश संखे , चांद भाई , नफीस भाई खान , निसार भाई शेख , वसीम अन्सारी , संदीप राठोड , श्रवण यादव , शैला ताई प्रसाद ,प्रीती ताई तिवारी , सिद्धार्थ वाघमारे , नैना गावडे ,बेबीताई व कार्यकर्ते उपस्थित होते.
पालघर प्रतिनिधी-ऋषीकेश जाधव
-
Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
-
LIVE TV