Palghar News – पालघर जिल्ह्यासाठी सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाकरिता एकूण ५२४.१२ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण अंतर्गत २३४ कोटी, आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत २७६.१२ कोटी व विशेष घटक योजने अंतर्गत १४ कोटींचा समावेश आहे.
या निधीचा वापर करून पालघर जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती मिळणार आहे. यामध्ये आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, कृषी, उद्योग, पर्यटन आदी क्षेत्रांचा समावेश आहे.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या निधीला मंजुरी देण्यात आली. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी सर्व यंत्रणांना मंजूर झालेल्या कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच निधीचा योग्य वापर करून जिल्ह्यातील विकासाला गती देण्याचे आवाहन केले.
या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजनांचा समावेश खालीलप्रमाणे आहे:
- औषधांसाठी सर्वसाधारण योजने अंतर्गत ५.५० कोटी व आदिवासी उपयोजने अंतर्गत ५.२३ कोटी असा एकूण १०.७३ कोटी निधी
- जिल्हा रुग्णालय, पालघर व अधिपत्याखालील रुग्णालयांसाठी अत्यावश्यक सेवेसाठी तसेच तातडीच्या वेळी जिल्हयातील रुग्णांसाठी कार्डीयाक रुग्णवाहीकेकरिता रु. ७६.०४ लक्ष
- शाळा दुरुस्ती व नविन वर्ग खोल्या बांधकामाकरिता रु.१५.६७ कोटी
- पालघर जिल्ह्यांतर्गत असलेल्या सर्व पेसा ग्रामपंचायतींना पायाभुत सुविधा, वनहक्क अधिनियम, पेसा कायद्याच्या अंमलबजावणी, आरोग्य स्वच्छता शिक्षण व वन्यजीव संवर्धन या करिता ५% अबंध निधी रु.५९.३६ कोटी
- रस्ता सुधारणा व जेटीची लांबी वाढविण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ कार्यालयाकरिता एकूण रु. ६.७० कोटी
- आदिवासी उपयोजने अंतर्गत संवेदनशिल आदिवासी क्षेत्रासाठी विशेष आरोग्यसेवा पुरविणे ५.५१ कोटी (जिल्हा परिषद पालघर.)
- पालघर जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्याकरिता डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार करिता रु.३९.०० कोटी
- जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी प्रोत्साहनपर सुवर्ण महोत्सव शिषवृत्ती रु. २४.०० कोटी
- पोलीस आयुक्त कार्यालय, मिरा भाईंदर, वसई-विरार कार्यालयाकरिता १० दुचाकी वाहने, २० चारचाकी वाहने व २ एसएमएल प्रिझन व्हॅन, पोलीस आयुक्त लोहमार्ग, मुंबई कार्यालयाकरिता २ चारचाकी वाहने, पोलीस अधिक्षक कार्यालय,पालघर पोलीस दलाकरिता ५ वाहने व ४ पिकअप वाहना करिता एकूण रु.२.८५ कोटी
- मच्छिमार बांधवांसाठी सातपाटी येथे मासळी मार्केट बांधकाम करण्याकरिता रु. ४.७५ कोटी, झाई येथे खाडीपाडा दगड फोडणे व गाळ काढणे व मच्छिमार बोटीसाठी अडथळा दूर करणे करिता रु. १.४५ कोटी, तसेच इतर मासेमारी बंदरांच्या विकासाकरिता रु. ५.३३ कोटी असा एकूण रु.११.५३ कोटी
✍पालघर प्रतिनिधी ऋषीकेश जाधव