रुद्राक्ष महोत्सवात झाली चेंगराचेंगरी,पंडित प्रदीप मिश्राच जबाबदार.. दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची -महाराष्ट्र अंनिसची मागणी..

0
501

सिहोर,मध्य प्रदेश :१९/२/२३

मध्यप्रदेश येथील कुबरेश्वर धाम येथे सुरू झालेल्या रुद्राक्ष महोत्सवात महाराष्ट्रातील एका महिलेची प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला. ही महिला रुद्राक्ष खरेदी करण्यासाठी रांगेत उभी होती. ती महाराष्ट्रातील रहिवासी आहे.

उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरी मुळे चार महिला बेपत्ता झाल्या असून सात दिवस चालणाऱ्या रुद्राक्ष महोत्सवात पंडित प्रदीप मिश्रा यांच्याकडून धार्मिक कथा सांगण्यात येत असून याकरिता लाखो भाविकांनी महोत्सवात गर्दी केली.

प्रशासन यंत्रणेबाबत सातत्याने सज्ज असते मात्र प्रचंड गर्दीमुळे कुबलेश्वर धाम मध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.

1200 900 17773447 thumbnail 4x3 kubreshwardham
रुद्राक्ष महोत्सवात झाली चेंगराचेंगरी-सिहोर मध्य प्रदेश


असा आहे सात दिवसीय भव्य उत्सव..
मध्यप्रदेशातील सिहोर येथे 16 फेब्रुवारीपासून रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवात शिवपुराण कथा होत आहे. पंडित प्रदीप मिश्रा कथा वाचन करीत आहे. सुमारे दहा लाख भाविक सिहोर मध्ये पोहोचले आहेत.

संपूर्ण संकुल वेळेपूर्वीच खचाखच भरले होते. या दुर्घटनेत एका भाविक महिलेला स्वतःचा जीव गमवावा लागला. इतरही चार महिला भाविक बेपत्ता असल्याची माहिती समोर येते.

मात्र या चेंगराचेंगरी च्या घटनेने कार्यक्रमाला गालबोट लागलाय. धार्मिक महोत्सवाच्या नावाखाली घडून आणलेल्या या दुर्घटनेला प्रदीप मिश्रा आणि आयोजक जबाबदार आहेत. त्यामुळे केवळ महाराष्ट्र पुरतं नव्हे तर देशासाठी जादूटोणाविरोधी कायद्याची गरज असल्याचं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी म्हटलंय.

केंद्र सरकारने या कायद्याचा विचार करावा आणि प्रदीप मिश्रा यांच्यासह आयोजकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने यासंदर्भात मध्यप्रदेश सरकारला तातडीने चौकशीचे आदेश द्यावे असं देखील समितीने म्हटलंय.

म्हणून लोकांनी अशा आध्यात्मिक धार्मिक, भोंदूबुवांच्या भूलथापांना कधीही बळी पडू नये असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, प्रधान सचिव संजय बनसोडे, गजेंद्र सुरकार, नंदकिशोर तळाशीलकर, डॉक्टर ठकसेन गोराणे यांनी केलय..
संजय मोहिते,शहादा शहर प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज शहादासह एम. डी. टी. व्ही. न्यूज ब्युरो,सिहोर, मध्य प्रदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here