मुलांचे वर्तन सुधारण्यासाठी पालकांनी करा हा सोपा उपाय…

0
94
  • मुलांना जेव्हा खायला दिले जाते तेव्हा त्याच्या आजुबाजूला कसे वातावरण आहे याकडे लक्ष द्या.
  • मुलांना खाताना मोबाइल किंवा टीव्हीवर कार्टून किंवा गाणी लावू नका.
  • मुलांना खाताना सकारात्मक आणि शांत वातावरण ठेवा.
  • मुलांसोबत खाताना गोष्टी सांगा, पुस्तके वाचा किंवा गप्पा मारा.
Parent Child Relation

स्पष्टीकरण:

लहान मुलांना सांभाळणे हे एक आव्हानात्मक काम आहे. त्यांना खायला घालणे, झोपवणे, खेळवणे यासोबतच त्यांची भावना आणि मानसिकता समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. काही मुलं सतत चिडचिड करतात, रागावतात आणि अॅग्रेसिव्ह वागतात. त्यांच्या या वर्तनामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र, काहीवेळा त्यांचे वर्तन त्यांच्या खाण्याच्या सवयींशी संबंधित असू शकते.

समुपदेशक प्रिती वैष्णवी यांच्या मते, मुलांना जेव्हा खायला दिले जाते तेव्हा त्याच्या आजुबाजूला कसे वातावरण आहे याकडे पालकांनी बारकाईने लक्ष द्यायला हवे. जसे अन्न तसे मन असे आपल्याकडे म्हटले गेले आहे. त्यामुळे आपण जे खातो आणि ते खाताना आपल्या भावना, मानसिक अवस्था जशी असते ती आपल्या शरीरावर, मनावर परीणाम करत असते. त्यामुळे मुलं खाताना जो विचार करतात तो त्यांच्या शरीरात उतरत असतो.

बऱ्याचदा मुलांना खावे म्हणून पालक त्यांना मोबाइल किंवा टीव्हीवर कार्टून किंवा गाणी लावून देतात. पण त्यामुळे मोबाइलमध्ये असलेले व्हायब्रेशन्स आणि रेडीएशन्स खाण्यासोबत मुलांच्या शरीरात जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जे काही पाहत आहेत त्यातील पात्र कशी आहेत हे लक्षात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण ती पात्रे खूप दंगा करत असतील, उड्या मारत असतील तर मुलांच्या आतही त्याच प्रकारची व्हायब्रेशन्स जातील.

त्यामुळे मूल काहीही खात असेल तेव्हा त्याच्या आजुबाजूला सकारात्मक आणि शांत वातावरण ठेवायला हवे. मोबाइलपेक्षा त्यांच्यासोबत बसून चित्रांची पुस्तके दाखवणे, गोष्टी सांगणे, गोष्टी पुस्तकातून वाचून दाखवणे या गोष्टी केल्यास त्याचा नक्कीच चांगला उपयोग होतो. याशिवाय खाताना मुलांसोबत कोणत्याही विषयावर गप्पा मारणे हाही चांगला पर्याय असू शकतो.

अशाप्रकारे शांत वातावरण ठेवल्यास मुलांच्या वागणूकीत नक्कीच बदल झालेला तुम्हाला दिसून येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here