नंदुरबार -२५/५/२३
चांदसैली घाटात झालेल्या अपघाताच्या हृदयद्रावक घटनेने जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहे.
वावी ता.धडगाव येथिल एकाच गावातील घरातले कर्ते पुरुष अचानक सोडुन गेल्याने कुटुंब व गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अशा अचानक झालेल्या घटनेने शासकीय यंत्रणा तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कार्यरत असते.
शासकीय यंत्रणेसोबतच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ .विजयकुमार गावित यांनी अपघातामध्ये मयत झालेल्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतली.
झालेल्या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मयताच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त शासकीय मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
तसेच पुन्हा चांदसैली घाटात अशा घटना होऊ नये. यासाठी सुरक्षा कठडे व वळण रस्ता दुरुस्तीचे काम त्वरित लावण्याचे आदेश पारित करू असे सांगितले.
वावी येथील ग्रामस्थांनी पाणीटंचाई विषयीचाही पाढा पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्यापुढे वाचला
त्यावर गावित यांनी सांगितले की,वावी गावातील पाणी प्रश्न त्वरित सोडवण्यात येईल.
पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्यासोबत धडगावचे शिवाजी पराडके व तळोदा नगरपरिषदचे मा.नगरसेवक रामानंद ठाकरे सोबत होते.
निलेश गरुड ,तळोदा तालुका ग्रामीण प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज