नंदुरबार :- तालुक्यातील चौपाळे शिवारातील पी.जी पब्लिक स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिवस निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली.
श्री.गोवर्धनसिंहजी शैक्षणिक सेवा समिती संचलित पी.जी पब्लिक स्कूलमध्ये आज सोमवारी पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली त्यानंतर संस्थेचे सचिव के.सी सरोदे यांच्यासह विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याप्रसंगी वृक्षारोपण संवर्धनाची विद्यार्थ्यांनी माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष पुष्पेन्द्र रघुवंशी, संचालक सिद्धार्थ रघुवंशी, कार्याध्यक्ष ॲड.रुद्रप्रताप रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य आनंद परदेशी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.