व्यावसायिकांवर कारवाई : तीन क्विंटल प्लास्टिक जप्त ; १० हजाराचा दंड वसूल
फोटो
नंदुरबार:शहरात गेल्या अनेक दिवसापासून थंडावलेली प्लास्टिक बंदी मोहीम पुन्हा सुरु करण्यात आली आहे. शहरात सर्रास प्लास्टीक विक्री सुरू असल्याने काल पालिकेचे मुख्याधिकारी पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टीक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. दोन व्यावसायिकांवर कारवाई करीत सुमारे ३०० किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले. दरम्यान, या व्यावसायिकाकडून १० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
राज्यभर बंदी असतांनादेखील नंदुरबारात प्लास्टीकची सर्रास विक्री सुरू होती. यामुळे पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी पुलकितसिंह यांच्यासह पालिकेचे पथक शहरातील नेहरू पुतळा परिसरातील रवी प्लास्टिक दुकानावर दाखल झाले.
तेथून सुमारे २०० किलो तर रेखा प्लास्टिकमधून १०० किलो अशा एकूण ३०० किलो बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्यात दोन्ही विक्रेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. या पथकात कार्यालय अधीक्षक जयसिंग गावित, स्वच्छता अभियंता विशाल कामडी, स्वच्छता निरीक्षक रवींद्र मराठे, बाजार लिपिक शशिकांत वाघ यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.