तृणधान्य आहाराने सजविलेल्या ताटांनी वेधले लक्ष..

0
124

नंदुरबार :२७/३/२३

महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने तेजस्विनी प्रदर्शनी कार्यक्रम दिनांक 21 महाराष्ट्र 24 मार्च दरम्यान शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आलय..

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करणवाल यांच्या हस्ते करन्यात आले.

यात जिल्हाभरातील ६० गटांनी स्टॉल लावून हाताने बनविलेल्या विविध खाद्य पदार्थासह पौष्टिक मेनू सादर केले.

प्रदर्शनीच्या पहिल्या दिवशी महिला बचत गटांनी आपले स्टॉलची बुकिंग व रजिस्ट्रेशन केले.श्रीमती मीनल करनवाल यांनी सर्व महिला बचत गटातील स्टॉलला भेट दिली व त्यांनी आणलेल्या वस्तूंबद्दल माहिती घेतली.
श्रीमती कांता बनकर यांनी प्रदर्शन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

प्रथम टप्प्यांमध्ये फाउंडेशन कडून तृणधान्य व आंतरराष्ट्रीय महिला दिवसच्या अनुषंगाने पथनाट्य सादर करण्यात आले.

यावेळी महिलांनी तृणधान्य वर आधारित सकस आहाराचे सादरीकरण केले.

आहाराने सजवलेले ताट व मेनूचा खमंग वासाने परिसर दरवळून निघाला.प्रदर्शनीच्या दुसरा टप्पात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश बागेश्वर, नाबार्डचे डीडीएम प्रमोद पाटील, मराविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता बनकर ,कृषी विज्ञान केंद्राचे कीड शास्त्रज्ञ पी.सी. कुंदे, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मिलिंद पाटील, श्याम पराडके, शुभम अकोले आदी उपस्थित होते.

अंतिम टप्प्यामध्ये श्रीमती आरती देशमुख, कृषी विज्ञान केंद्र यांनी आभार मानले.
जीवन पाटील,कार्यकारी संपादक,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here