डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी केला स्थानिक अधिकार्यांचा सन्मान ..

0
231

नंदुरबार :०४/०३/२०२३
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील हे दिनांक 01ते 02 मार्च रोजी पावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले होते .
दि.02 मार्च रोजी 11.00 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयातील संवाद हॉल येथे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा प्रभारी अधिकारी यांचे करीता गुन्हे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत समन्स वॉरंट बजावणी, खावटी वॉरंट बजावणी, CCTNS कामकाज, मुद्देमाल निर्गती तसेच वर्षभराच्या काळात नंदुरबार जिल्हा घटकात दाखल मंदीर चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपीतांना अटक करून त्यांचेकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणाऱ्या पोलीस तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचा प्रमाणपत्र तसेच पुष्पगुच्छ देवून याप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

apindb
अंमलदाराचा सत्कार करतांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील

शहादा येथील सुघोषाघंट मंदीर एवंम जैन मंदीर दादावाडी व दंडपाणेश्वर गणपती मंदीर येथील मंदीर चोरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व त्यांचे पथकाचा तसेच देवमोगरा माता मंदीर बर्डीपाडा, विसरवाडी येथील मंदीर चोरीबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या पथकाचा सत्कार करण्यात आला.
तसेच सन 2022 मध्ये उत्कृष्ट समन्स बजावणीसाठी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, उत्कृष्ट नॉन बेलेबल वॉरंटच्या बजावणीसाठी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, खावटी वारंटच्या उत्कृष्ट बजावणीसाठी व CCTNS च्या फॉर्म फिडींगसाठी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडीत सोनवणे तसेच वर्ष भरातील काळात मुद्देमालाची उत्कृष्ट निर्गती केल्याबद्दल नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या प्रसंगी सत्कार करण्यात आला.

हे हि वाचा :मनसेच्या नेत्यावर हल्ला, रुग्णालयात दाखल..!

गुन्हे आढावा बैठकी दरम्यान नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी मागील दोन वर्षाच्या कालावधीतील गुन्ह्यांच्या विविध प्रकारात झालेली वाढ / घट, गुन्हे शाबितीचे प्रमाण, अवैध धंद्यांविरुध्द् कारवाई, मुद्देमाल निर्गती, मालमत्तेविरुध्द्चे ना उघड गुन्हे, प्रतिबंधक कारवाई तसेच प्रशासकीय बाबींचा आढावा घेतला.

सराईत गुन्हेगारांविरुध्द् कठोर कारवाई करण्याबरोबरच सामान्य जनतेशी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सौजन्य राखावे असे ही त्यांनी सांगितले.
तसेच टोळ्यांमध्ये काम करणाऱ्या गुन्हेगारांचे गँग हिस्ट्रीशिट उघडून गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे बाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

पोलीस अधीक्षक,नंदुरबार पी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या गुन्हे प्रकटीकरण, गुन्हे निर्गती, मुद्देमाल निर्गती, समन्स वॉरंट बजावणी व सी.सी.टी.एन.एस. पोर्टलच्या कामकाजाबाबत तसेच जिल्हा पोलीस दलाच्या एकंदरीत कामकाजाबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी समाधान व्यक्त केलं .

सदर कार्यक्रमाच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ..बी.जी.शेखर पाटील, नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, शहादा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस उप अधीक्षक विश्वास वळवी, स्थानिक गुन्हे शोखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी उपस्थित होते..

प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here