पीआय दत्तात्रय शिंदे यांची कारवाई : ९० हजाराचा मुद्देमाल जप्त
धुळे :- तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तालुक्यातील मोराणे गावाच्या शिवारामध्ये बेकायदेशीररित्या चालणाऱ्या बनावट दारू कारखान्यावर छापा टाकून ९० हजार ७१४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पीआय दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मोराणे गावाचे शिवारामध्ये श्री.संस्कार मतिमंद मुलींचे बालगृहाच्यासमोर एका बंद घरामध्ये बेकायदेशिर व आरोग्यास हानिकारक व बनावट दारू बनविली जाते. खात्रीलायक बातमी मिळाल्याने तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी दोन पंचासमक्ष त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या ठिकाणी तीन इसम बनावट दारु बनविताना साहित्यनिशी आढळून आले. मलिंदरसिंग गुरुमुखसिंग शिखलकर, रमेश गोविंदा गायकवाड, भिलु भिवराज साळवे असे तिघे राहणार धुळे यांना ताब्यात घेऊन कारखान्यातील बनावट दारूसह साहित्य असा एकूण ९० हजार ७१४ रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी जप्त केला.
तसेच सदरची बनावट दारु ही युनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड युनिट बारामती पिंपली महाराष्ट्र ४१३१०२ यांचे नावे बनलेली दिसत असून त्यावर लायसन क्रमांक देखील देण्यात आला आहे. धुळे तालुका पोलिसांनी बनावट दारु निर्मिती कारखाना उघडकी आणला असून या संशयिताविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे तसेच विजय जाधव, सुनिल विंचूरकर, पोहेकॉ रविंद्र राजपुत, रविंद्र सोनवणे, राकेश मोरे, कांतीलाल शिरसाठ यांच्या पथकाने केली.
दिलीप साळुंखे. एम.डी.टी.व्ही. न्युज धुळे.