नंदुरबार :- नवापूर शहरात विना परवाना मद्यसाठा करून तो विक्रीसाठी शेजारील गुजरात राज्यात नेणार असल्याच्या गुप्त माहितीनुसार नाशिक येथील विशेष पोलीस महानिरक्षकांचे पथक व नवापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन ८९ लाख २ हजार ४९५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
यात ५ लाख ६९ हजार १०५ रुपयांचा देशीविदेशी मद्यसाठा, २ लाख ७८ हजार ३९० रुपयांच्या रोकडचा सामावेश आहे.
याप्रकरणी १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांच्या या कारवाईने अवैध मद्यसाठा व विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नवापूर शहरात विना परवाना मद्यसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार नाशिक येथील विशेष महानिरीक्षकांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश भटू पाटील, उपनिरीक्षक रविंद्र ईश्वर शिलावट, बशीर गुलाब तडवी, पो.ह. शेख शकील अहमद, पो.ना. प्रमोद सोनु मंडलीक, मनोज अशोक दुसाने, चा.पो.शि. नारायण कचरु लोहरे, नवापूर पोलीस स्टेशनचे पोनि ज्ञानेश्वर वारे, पोउनि अशोक मोकळ, असई युवराजसिंग परदेशी, पोशि परमानंद काळे, पोशि रणजित महाले यांनी नवापूर येथील गणेशहिल परीसरात जावून रात्री १०.३० वाजेच्या सुमारास छापा टाकला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तेथे सुमारे ५ लाख ६९ हजार १०५ रुपये किमतीचा विदेशी दारु, बिअर प्रोव्हीशन गुन्ह्याचा माल, २ लाख ७८ हजार ३९० रुपयांची रोकड, ७८ लाख रुपये किमतीचे १७ चारचाकी वाहने, २ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या ९ मोटरसायकली असा एकुण ८९ लाख २ हजार ४९५ रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आलाकौशिक सुरेशभाई पटेल, पंकजभाई ईश्वरभाई पटेल, शाम अचल माजी, अंगतसिंह दिनेशसिंह भदौरिया, प्रतीक सुमनभाई पटेल, अखिलेश शिवदान सिंहभदौरिया, अनिलसिंह सुरेंद्रसिंह भदौरिया, सामंतसिंह शिवपालसिंह भदौरिया, सुरजकुमार हाकिम सिंह, जितेंद्रसिंह समशेरसिंह भदौरिया, पुट्टसिंग भदौरिया, कृष्णकुमारसिंह शिवदानसिंह भदौरिया, शामसिंह रामप्रसादसिंह भदौरिया, शिवप्रताप तिलकसिंह भदौरिया, अजीत पवार लोखंडे व नवापूर येथील गणेश हिल परिसरातील रहिवासी असलेले दोन विधीसंघर्षीत बालक यांनी संगनमत करुन विनापरवाना बेकायदा गुन्ह्याचा माल (मद्य) बेकायदेशीररित्या गुजरात राज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या कब्जात बाळगला.
त्याचा साठा करुन तो पिकअप व इन्व्होवा कारमध्ये भरतांना मिळून आले आहेत.
पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
घटनास्थळी मिळून आलेल्या चारचाकी १७ वाहनापैकी १५ वाहनांचे सिट दारु वाहतुकीसाठी कारण्यात आलेले आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्यूज ब्युरो, नंदुरबार