ब्रेकिंग -राजकीय भूकंप… शिंदेंचे १५ आमदार अपात्र होणार ..

0
942

अंजली दमानियांचे खळबळजनक ट्विट

मुंबई -१२/४/२३

अंजली दमानिया यांनी ट्विट करुन हा दावा केला आहे.

ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते.

तिथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत. तेही लवकरच.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0

बघू आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाची भाजपला धास्ती

राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

शिंदे गटाच्या आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.

त्याचाच संदर्भ देत सरकारमधून 15 आमदार बाद होणार, असा दावा अंजली दमानिया केला आहे.

शिंदे गटाचे 15 आमदार अपात्र ठरल्यानंतर सरकार अल्पमतात येईल व महाराष्ट्रासारखे मोठे राज्य गमावणे भाजपला परवडणारे नाही. अशात भाजप अजित पवारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल व सरकार वाचवण्यासाठी काही आमदारांसह अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करतील, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

शरद पवारांचा B प्‍लॅन : शिंदेंचे 16 आमदार अपात्र ठरल्यास भाजपला पाठिंब्याची चर्चा

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, मोदींची पदवी, अदानींची जेपीसी चौकशी, ईव्हीएम या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस व उद्धव सेनेशी विसंगत भूमिका घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीत दुफळी निर्माण झाली.

शिवसेनेत फूट पडल्याने सत्तेतून पायउतार व्हावे लागलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी ‘बी प्लॅन’वर काम करत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0

शरद पवारांची भाजप अनुकूल भूमिका हा त्याचाच भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पवार याचे खंडन करत असले तरी मित्रपक्षांना मात्र त्यांच्या खेळीची धास्ती वाटतेय. यापूर्वी सावरकरांच्या मुद्द्यावर पवारांनी राहुल गांधींचे कान टोचले, आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडताना आम्हाला विचारले नव्हते, अशी वक्तव्ये करून पवार आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आणत आहेत. 

ब्युरो रिपोर्ट ,एम डी टी व्ही न्यूज मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here