शिंदखेडा : १९/३/२३
शिंदखेडा नगरपंचायतन शहरात ठिकठिकाणी गटारीचे काम केले..
गटारीवरील डापे उखडून गेले आहेत..
त्यामुळे दुचाकी वाहनांचा अपघाताचे प्रमाण वाढले..
ह्यासंबंधी भिल समाज विकास मंचचे अध्यक्ष दिपक अहिरे तथा माजी नगरसेवक यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत बिडगर यांना तक्रार देवुन सदर गटारीचे कोणत्या स्वच्छता ठेकेदाराला दिले याची विचारणा केली..
त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी सदरील ठेका रद्द करण्यात यावा.
गटारीच्या जाळ्या देखील तुटल्याने डापे उकळल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असुन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
येथील प्रत्येक रहिवासीच्या घरात सांडपाण्याच्या दुर्गंधी मुळे रुग्ण आढळत आहेत.
शहरात साथीचे आजार पसरत असल्याने रुग्ण आढळत आहेत
रहिवाशी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, जिवित हानी होण्याची नगरपंचायत मुख्याधिकारी व स्वच्छता ठेकेदार वाट पाहत आहेत काय ? असा गंभीर आरोप माजी नगरसेवक दिपक अहिरे यांनी ह्यावेळी केला आहे.
तसेच काल परवा पर्यंत तीन चार दुचाकी व चारचाकी वाहने गटारीत अडकल्याने नुकसान झाले आहे. रात्री बे रात्री वाहन व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे..
म्हणून नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष घालावे हा गटारीचा प्रमुख प्रश्न मार्गी लावावा ..
अन्यथा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहरातील महिला नागरिकांसह मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिपक अहिरेसह रहिवासी नागरिकांनी दिला आहे.
यादवराव सावंत , तालुका प्रतिनिधी,शिंदखेडा, एम डी टी व्ही न्यूज..