अपुऱ्या वीज पुरवठ्याचा बळीराजाला झटका..

0
343

शेतकऱ्यांसह शिवसेना पदाधिकारी धडकले वीज वितरण कंपनी कार्यालयावर

शिंदखेडा /धुळे :17/6/23

महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा देण्याचा शब्द देण्यात आला होता मात्र वितरण कंपनीकडून तो शब्द पाळला गेला नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला
शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शाना सोनवणे आणि शेतकरी रावसाहेब इशी यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आमरण उपोषण केले
तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक लावून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या मात्र कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी शब्द दिला होता तो मात्र त्यांनी पाळला नाही
24 तासातून आठ तास वीज पुरवठा नियमितपणे शेतकऱ्यांना केला जाईल मात्र दिवसातून केवळ दोन ते तीन तास वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी प्रचंड नाराज झाले
शेतीत पेरणी केलेली बियाण्यांचं नुकसान होऊन दुबार पेरणीची आता वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे
आधीच महागाईने होरपळून गेलेल्या शेतकऱ्याला वेळेत वीजपुरवठा मिळत नसल्याने तो अधिकच त्रस्त झाला आहे
जोपर्यंत नियमित वीज पुरवठा शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम राहील असा पवित्रा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता
दोंडाईचा येथील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आर बी जोशी यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यासाठी आले असता अभियंतांची भेट होऊ शकली नाही तर केवळ सुभाष चौधरी इथं उपस्थित होते
ब्राह्मणे व लंघाणे येथील कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आली

हे सुध्दा वाचा

“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी –


मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना उडवा उडवीची उत्तरे मिळाल्यानंतर शेतकरी आणि शिवसेनेचे पदाधिकारी अधिकच संतप्त झाले
हे ठिय्या आंदोलन तीन तास चालू होते

ef57861a 969f 4abb 8658 04bc4896c38b

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
अखेर कार्यकारी अभियंता जोशी यांनी आश्वासन दिले की शेतकऱ्यांना नियमित आठ तास वीज पुरवठा केला जाईल
उपअभियंता बोरसे यांनी निवेदन स्वीकारल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं
शेतकऱ्यांनी आणि सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सध्याच्या सरकारच्या आणि वितरण कंपनीच्या या भूमिकेविरोधात चांगलीच घोषणाबाजी केली
राज्य सरकारचा निषेध असो महावितरण कंपनीचा निषेध असो, लवकर या लवकर या जोशीसाहेब लवकर या शेतकऱ्यांना न्याय द्या तर गिरासे या शेतकऱ्यांन कंपनीच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता सेनेचे पदाधिकारी शाना सोनवणे त्यांनी त्याला वाचवण्यात यश आलं अखेर त्यांच्या ठिय्या आंदोलनाला यश आलं आणि कार्यकारी अभियंता जोशी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायम संघर्ष करणाऱ्या सेनेच्या शाना सोनवणे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली
शाना भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है..
तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी कुठलाच लोकप्रतिनिधी धावून येत नाही आपण आलेत याबरोबर कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करणाऱ्या या लढवय्या नेत्याचं कौतुक यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आलं
त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शाना सोनवणे, शिव मावळा प्रतिष्ठानचे प्रमुख विजय पाटील, लोहगाव चे सरपंच चिंतामण माळी, माजी सरपंच महेंद्र पाटील, शेतकरी ज्ञानेश्वर पाटील,राहुल पाटील यांच्यासह विविध शेतकरी यावेळी उपस्थित होते..
लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा संदर्भातल्या मागण्या मान्य होतील आणि सुरळीतपणे त्यांना वीज पुरवठा मिळेल ही आशा करूया
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी, एम डी टीव्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here