नंदुरबार -६/४/२३
तळोदा तालुक्यातील बोरद गावातील सेवानिवृत्त वनाधिकारी दिगंबर गणपत ढोडरे यांचा नातू व वासुदेव दिगंबर ढोडरे यांचे चिरंजीव प्रज्वल वासुदेव ढोडरे यांनी भारत सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या युनिक पब्लिक सर्विस कार्पोरेशन च्या सेंट्रल आर्म पोलीस फोर्सची UPSC यूपीएससी परीक्षा सन 2019-20 मध्ये उत्तीर्ण झाल्याने त्यांचा सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स सीआरपीएफ मध्ये निवड झाली आहे
त्यांनी एका वर्षासाठी प्रशिक्षण दिल्ली गुरुग्राम येथे असलेल्या सीआरपीएफ अकॅडमी अतिशय कठीण असलेल्या प्रशिक्षण जिद्दीने व चिकाटीने पार पाडले आहे.
दिल्ली गुरुग्राम येथे CRPF अकॅडमीत नुकत्याच पार पडलेल्या सीआरपीएफच्या 53 व्या दीक्षांत समारोहात प्रज्वल ढोडरे यांनी परडचे नेतृत्व करण्याचा मान मिळवला
त्याबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याकडून सन्मानित करण्यात आले
व पुरस्कार देण्यात आला
त्यांच्या यशाबद्दल ढोडरे परिवार व बोरद ग्रामस्थ नातेवाईक मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.
त्यांचे आजोबा दिगंबर ढोडरे हे नागपूर जवळील रामटेक येथे नोकरी निमित्त स्थायिक झाले होते
ते नागपूर वन अधिकारी म्हणून कार्यरत होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉबअपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
ते सेवानिवृत्त झाल्यामुळे ते रामटेक येथे स्थायिक झाले आहेत
त्यांच्या नातू प्रज्वल ढोडरे यांनी नुकतीच UPSC यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशिक्षण पुर्ण केल्याने त्यांचे नागपूर प्रशासनामार्फत प्रशिशिस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला त्यांच्या यशाने नंदुरबार जिल्हा ,तळोदा तालुका ,बोरद येथील ढोडरे परिवाराचे नाव लौकिक केले आहे
व महाराष्ट्रातून बोरद गावाचे नाव उज्वल केल्याने प्रज्वल ढोडरे यांना ग्रामस्थ ग्रामपंचायत विविध संस्थांचे पदाधिकारी समाज बांधव यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…MDTVNEWS परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा..
नारायण ढोडरे,
प्रतिनिधी ग्रामीण नंदुरबार,एम. डी. टी. व्ही.न्यूज