तळोदा येथे आदिवासी समाज पंचांना स्वयंपाक भांडे वाटप

0
584

तळोदा : येथील येथील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रानिमित्त आयोजित कार्यक्रमात तळोद्यातील प्रभाग 7 मधील पाडवी गल्ली व प्रभाग 1 मधील आदिवासी समाज पंच मंडळास अन्नदान कार्यक्रमासाठी स्वयंपाकाला लागणारे सर्व साहित्य देण्यात आले.

8dc72c0f 52ba 40cd a5fe 5dfecd7e3299

सकाळी 11 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ गौरव यात्रा संपन्न झाल्यानंतर योगेश चौधरी यांचे जनसंपर्क कार्यालय येथे साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले. आ.राजेशदादा पाडवी, प्रदेश महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, शहर मंडल अध्यक्ष योगेश चौधरी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, प्रधानमंत्री आत्मनिर्भर अभियानाचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी ,जिल्हा संघटन मंत्री निलेश माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी जिल्हा चिटणीस तथा बूथ सशक्तीकरण अभियानाचे संयोजक हेमलाल मगरे, तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, जिल्हा संघटनचे बळीराम पाडवी, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, कल्पेश चौधरी, जितेंद्र सूर्यवंशी, शक्ती केंद्रप्रमुख तथा माजी नगरसेवक रामानंद ठाकरे, जालंधर भोई, रमेश नारायण पाटील, दीपक जीवन चौधरी, आदिवासी आघाडीचे दारासिंग वसावे, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिरीष माळी, किरण सूर्यवंशी, विस्तारक कमल परदेशी, सुनील परदेशी, सरचिटणीस पंकज तांबोळी, चिटणीस गोकुळ पवार, उपाध्यक्ष राजकपूर मगरे, माजी नगरसेवक गौरव वाणी, दीपक पाडवी, विविध आघाडी, मोर्चा, सेलचे अध्यक्ष तथा सदस्य, अरविंद प्रधान, धनराज पाडवी, प्रमोद चौधरी, कौशल सवाई, मनोज परदेशी, गणेश चौधरी, राकेश चौधरी समवेत कार्यकर्ते व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

SPONSORED CONTENT

महेंद्र सूर्यवंशी, एम.डी.टी.व्ही. न्युज तळोदा

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here