फूलसरा येथे विना परवाना वाजंत्री वाजविल्याने गुन्हा

0
292
52c33b44 d153 4749 b2bd e220f529ec57 1

नंदुरबार : तालुक्यातील फुलसरा येथे लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात रात्री उशिरापर्यंत विना परवाना वाजंत्री वाजविल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील फुलसरा येथे लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात विना परवाना बेकायदेशीररित्या रात्री उशिरापर्यंत वाजंत्री वाजवून मोठमोठ्याने गाणे लावून नाचतांना आढळून आले.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वंतू गावित यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात मच्छिंद्र हुपा नाईक, धरमसिंग शिवदास पाडवी व योगेश राजू वळवी यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३८ (१) (क) १३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पानाजी वसावे करीत आहेत.

SPONSORED CONTENT

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here