धामडोद येथे एकास काठीने मारहाण

0
270
66233015

नंदुरबार : तालुक्यातील धामडोद येथे परिवाराच्या बाबतीत गैरसमज करुन विरुद्ध वागत असल्याने गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन एकास काठीने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील धामडोद येथील सुखराम मक्कन कोटवाय यांच्या परिवाराच्या बाबतीत खंडू मंगल भिल हा गैरसमज करुन विरुद्ध वागत होता. याबाबत सुखराम कोटवाय यांनी खंडू भिल याचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने सुखराम कोटवाय यांना खंडू भिल याने काठीने छातीवर, पाठीवर व उजव्या हाताच्या मनगटावर मारुन दुखापत केली. तसेच जिवेठार मारण्याची धमकी दिली.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत सुखराम कोटवाय यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात खंडू भिल याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.गुलाबसिंग वसावे करीत आहेत.

SPONSORED CONTENT
RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here