धडगावला पैशांच्या वादातून एकास मारहाण

0
286

नंदुरबार : धडगाव शहरातील भीमनगर येथे ऊसनवार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एकास जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

66233015 2

याबाबत पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, धडगाव शहरातील भीमनगर येथील मनोहर बालसिंग हुरेज यांनी त्यांचे सासरे रमेश ठाकूर यांना दिलेले ऊसनवार पैसे परत मागितले. याचा राग आल्याने मनोहर हुरेज यांना गणेश रमेश ठाकूर याने दगडाने कपाळावर मारुन दुखापत केली. तसेच मनिषा गणेश ठाकूर, सुनिता मनोहर हुरेज यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

SPONSORED CONTENT

तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत मनोहर हुरेज यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.शशिकांत वसईकर करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here