नंदुरबार -२/६/२३
मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दुचाकीस्वाराने व त्याच्या मागील सीटवरुन प्रवास करणाऱ्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक आहे. असे असतानाही अनेक मोटार सायकल चालक हेल्मेटचा वापर करीत नसल्याचे आढळून आले आहे. दैनंदिन घडणा-या रस्ते अपघातात सर्वाधिक अपघात दुचाकीचे आहेत.
हेल्मेट न घाताल्यामुळे मृत्युमुखी पडणान्या दुचाकी स्वारांची संख्या मोठी असून दरवर्षी राज्यात सुमारे ७००० दुचाकी स्वार रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे देखील वाचा:
दुचाकी स्वारांनी वाहतुकीचे नियम पाळावे व त्यांना हेल्मेटचे महत्व पटावे यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्याव्दारे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालये, शैक्षणिक संस्था, बँका, मॉल्स, हॉटेल्स इत्यादींना हेल्मेट सक्ती बाबत नोटीस बजावण्यात येत असून हेल्मेट न घालणा-या दुचाकी स्वारांना त्यांच्या संस्थेत प्रवेश न देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत
कलम १९४ ड अन्वये विनाहेल्मेट मोटार सायकल चालविणे किंवा चालविण्यास संमती देणे.अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असून त्यांना दंडात्मक कारवाईची तरतुद करण्यात आली आहे. एक हजार रुपये दंड व तीन महीने ड्रायव्हींग लायसन्स निलंबित करण्याची तरतूद आहे.
तरी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना तसेच सर्व कार्यालये संस्था यांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपल्या कार्यालयात / आस्थापनेच्या आवारात विना हेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणान्यास प्रतिबंध करावा. स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्वानी हेल्मेटचा वापर करावा.किरण बिडेकर,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांनी हे आवाहन केलंय
प्रविण चव्हाण ,प्रतिनिधी ,एम डी टी व्ही नंदुरबार..

