तळोदा :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मानव विकास मिशन योजने अंतर्गत मालदा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या धोजापाणी (ता,तळोदा) येथील ३० लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन याप्रमाणे ३० बैल जोडीचे वाटप करण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
याप्रसंगी पंचायत समिती तळोदाचे पशूधन विकास अधिकारी डॉ.सुनील गोस्वामी, बोरदचे पशुधन विकास अधिकारी डॉ.महेंद्र जमदाळे, डॉ.हिम्मतसिंग पावरा, मानव विकास मिशन तालुका समन्वयक रंजना पावरा, सरपंच गोपी पावरा, उपसरपंच बेताब पावरा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आमदार राजेश
पाडवी यांचे प्रतिनिधी म्हणून संजय कलाल उपस्थीत होते.

तालुका पेसा समन्वयकसंदिप सूर्यवंशी, ग्रामसेवक आर.टी. गावित, अमृत पावरा, विजू मावची, मगन ठाकरे, रोहिदास पावरा, डोंगरसिंग पावरा, गब्बरसिंग पावरा, नटवर पावरा, टेट्या पावरा आदि लाभार्थी उपस्थीत होते,
महेंद्र सूर्यवंशी. एम.डी.टी.व्ही. न्युज तळोदा.

