ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान अधिकाऱ्यांना तहसीलदारांकडून प्रशिक्षण…! | Prakasha Training of Polling Officers by Tehsildars

0
193
Prakasha Training of Polling Officers by Tehsildars

Prakasha News – सकारात्मक राहून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे, कामात हयगय टाळाटाळ करू नये, आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना तहसीलदार दीपक गिरासे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ज्या कर्मचाऱ्यांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. त्यांना प्रशिक्षणात उपस्थित कर्मचाऱ्यांना दिल्यात.

शहादा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व दहा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना

download

चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात प्रशिक्षण दिले.या प्रंसगी तहसीलदार दीपक गिरासे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना स्लाइड शोद्वारे व प्रत्यक्ष मशिनचे प्रात्यक्षिक दिले.केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी, सहाय्यक मतदान अधिकारी आदींसह जवळपास ३०० कर्मचारी उपस्थित होते. सकाळी 11 ते दुपारी दोन या दरम्यान एक प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये तहसीलदार गिरासे म्हणाले, की मतदानाच्या दिवशी प्रत्येक कर्मचाऱ्याने आपापले कर्तव्य चोखपणे काळजी पूर्वक पार पाडणे आवश्यक आहे.

मतदान यंत्रांची चाचणी करून उमेदवार किंवा प्रतिनिधींसमोर मॉकपोल झाल्यावर प्रत्यक्ष मतदान वेळेत सुरू करावे, मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर काळजीपूर्वक साहित्य तपासून घेणे, मशिन सील करताना टॅग, सील, एबीसीडी पट्टी, विविध साहित्य व्यवस्थित लावावे. सकाळी मॉकपोल करून घ्यावे. ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले काम, कर्तव्ये चोखपणे पार पाडावीत. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, सांगितले.

नायब तहसीलदार विजय साळवे, शैलेंद्र गवते, प्रदीप पाटील, तलाठी जिजाबराव पाटील, कर्मचारी जे. पी. अहिरे, किरण साळवे, बबलू मणियार आदी उपस्थित होते.

नरेंद्र गुरव प्रकाशा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here