चारशे कोटींचा प्रकल्प गेला अंधारात ..

0
119

सारंगखेडा :३१/३/२३

येथील तापी नदीवरील बॅरेजची वीज पुरवठा तांत्रीक अडचणी मुळे खंडीत झाल्या मुळे गेल्या दोन महिन्यापासून चारशे कोटीचा प्रकल्प अंधारात आहे .

त्यामुळे रात्रीची सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली आहे .
सारंगखेडा येथील तापी नदीवरील प्रकल्प २००८ पासून उभारण्यात आला .

त्याद्वारे पाणी अडविले जात आहे .

पावसाळ्या नंतर ११ मीटर पाणी साठा अडविण्यात येतो .

उन्हाळयात पाण्याची पातळी कमी होते .

येथे सुविधांचा मोठा अभाव आहे . दोन , तीन महिने विज बिल न भरल्यास विज वितरण कंपनी प्रकल्पाची विज पुरवठा खंडीत करतात .

असा प्रकार वारंवार होत आहे .

गेल्या दोन महिन्यांपासून ६० हजार रुपयांचे विज बिल थकविल्याने विज वितरण कंपनीने दोन महिन्यापूर्वी विज पुरवठा खंडीत केला होता.

त्यानंतर गेल्या आठवड्यात विज बिल भरणा केल्यामुळे विज वितरण कंपणीने वीज पुरवठा जोडला , मात्र बॅरेजची विज केबलच्या तांत्रीक अडचणीमुळे चारशे कोटीचा प्रकल्प अंधाऱ्यांत आहे .

त्यामुळे रात्रीची सुरक्षा ऐरणीवर आली आहे असे सारंगखेडा येथील सामाजिक कार्यकर्ता अशोक कुवर यांनी एम डी टी व्ही च्या मार्फत सांगितले आहे.

सुरक्षा रक्षकांना पगार नाही .

प्रकल्पाच्या सुरक्षेतसाठी प्रकल्पाच्या दोघी बाजू रात्री व दिवसा सुरक्षा रक्षक आहेत . मात्र त्यांना गेल्या आठ महिन्यापासून पगार मिळालेला नाही . तरीही काम करीत आहेत . रात्री विज नसल्याने प्रकल्पाजवळ हिस्त्र प्राणी , साप आदीचा वावर असल्याने भीतीने सुरक्षा रक्षकांना रात्र काढावी लागते .

त्यामुळे सुरक्षा रक्षकच असुरक्षित आहेत .

सीसीटीव्ही कॅमेरे धुळखात .

प्रकल्पाच्या सुरक्षतेसाठी ठिकठिकाणी चार वर्षा पूर्वी चांगल्या दर्जेच्या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत .

मात्र तीन वर्षापासून बंद आहेत .सीसीटीव्ही कॅमेरे धुळखात आहेत.त्यामुळे प्रकल्पाजवळ कोण येत आहे .

कोण उडी घेत आहे.हे दिसत नाही.

अनेक वेळा येथे आत्महत्या करणारे ही येथूनच उडी घेतात, त्यामुळे लाखो रुपये खर्च करून यंत्रणा बसविण्यात आली असतांनाही उपयोगात येत नसल्याचे चित्र आहे .

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

शिवाय टीव्ही स्क्रीनदेखील बंद अवस्थेत आहे . येथे कायमस्वरूपी तांत्रीक कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.
गणेश कुवर ,सारंगखेडा प्रतिनिधी ,एम. डी. टी. व्ही.न्यूज, शहादा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here