नवापूर :- महिलांकरिता शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध व्हावी, महिलांना त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन जिल्हाभरात करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नवापूर येथे दिनांक २३ रोजी तहसिल कार्यालय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शिबिराच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित होत्या. यावेळी भाजपचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, तहसिलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी सी.के.माळी, मुख्याधिकारी सप्नील मुधलवाडकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र बिरारी, तसेच सर्व प्रशासकीय विभागाचे तालुकास्तरीय विभागप्रमुख व प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शासनाच्या विविध विभागामार्फत महिलांसाठी सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती करून घेऊन त्यांचा लाभ घेण्यात यावा यासाठी महिलांनी निसंकोचपणे पुढे यावे, असे आवाहन सौ. संगीता गावित यांनी यावेळी केले. नंदुरबार जिल्हात महिलांच्या आरोग्यविषयक व बालकांच्या कुपोषणाच्या समस्या आहेत. परंतु कुपोषणासाठी विविध सामाजिक घटक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कारणीभूत आहेत. त्यापैकी बालविवाह हा एक घटक असून आपल्या सर्व लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणा यांनी एकत्र येऊन बालविवाह होऊच नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.तसेच बालविवाहाचे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली.
नंदुरबार जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी दिनांक ०८ मार्च २०२३ जागतिक महिला दिनापासून माननीय पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे पुढाकारातून “मिशन अक्षता” हि मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यात देखील प्रशासनास यश आलेले आहे. सदर मोहिमेत लोकांचा सहभाग अतिशय महत्वाचा असून त्यांनी देखील बालविवाह होऊच नये यासाठी प्रशासनास सहकार्य करावे व माहिती द्यावी.तसेच ग्रामपातळीवर महिला सभा व बाल पंचायत नियमितपणे व प्रभावीपणे घेण्यात याव्यात अश्या सूचना प्रशासनास केल्या.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीरासाठी प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी,नवापूर संजय कोंडार यांनी केले. शिबिरासाठी उपस्थित महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली तसेच उपस्थित महिलांना त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन योजनांचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले.तसेच हा फक्त एक दिवसीय कार्यक्रम नसून महिलांनी त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांबाबत लाभ घ्यावा व तसेच आपल्या तक्रारींचे निसंकोचपणे मांडून त्यांचे निवारण करून घ्यावे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समस्या समाधान शिबिरासाठी सर्व तालुकास्तरीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयक स्टॅॉल मांडण्यात आले होते. सदर स्टॅॉलला उपस्थित महिलांनी भेटी देऊन शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती घेतली. सदर शिबिरावेळी उपस्थित महिलांनी त्यांच्या तक्रारी प्रशासनासमोर मांडल्या. प्राप्त तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करणेबाबत सभापती संगीता गावित, तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी विविध विभागाच्या प्रमुखांना सूचना दिल्या.
एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार