बनावट दारू कारखान्यावर छापा,90 हजार 714 रुपयाचा मुद्देमाल जप्त..

0
228

धुळे – १०/५/२३

धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तालुक्यातील मोराणे गावाच्या शिवारामध्ये बेकायदेशीर रित्या चालणाऱ्या बनावट दारू कारखान्यावर छापा टाकून 90 हजार 714 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तर या कारवाईत तीन आरोपींना अटक केली आहे.
या दमदार कारवाईमुळे धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पीआय दत्तात्रय शिंदे यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे तोंड भरून कौतुकही केले जात आहे.
धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पीआय दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मोराणे गावाचे शिवारामध्ये श्री. संस्कार मतिमंद मुलींचे बालगृहाच्या समोर एका बंद घरामध्ये बेकायदेशिर व आरोग्यास हानिकारक व बनावट दारू बनवत आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी दोन पंचासमक्ष बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकून कारवाई केली
सदर ठिकाणी तिन इसम बनावट दारु बनविताना साहित्यनिशी आढळून आले.
त्यात मलिंदर सिंग गुरुमुखसिंग शिखलकर, रमेश गोविंदा गायकवाड, भिलु भिवराज साळवे असे तिघे राहणार धुळे यांना ताब्यात घेऊन कारखान्या.. तील बनावट दारू सह साहित्य असा एकूण 90 हजार 7 14 रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी जप्त केला.
तसेच सदरची बनावट दारु ही युनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड युनिट बारामती पिंपली महाराष्ट्र 413102 यांचे नावे बनलेली दिसत असून त्यावर लायसन क्र. 10013043000623 असे असल्याचा दिसत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
अशा प्रकारे धुळे तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी अशांनी बनावट दारु निर्मिती कारखाना उघडकीस आणला असून या आरोपींविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील ,पोलीस अधिक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ..
धुळे तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे तसेच विजय जाधव,सुनिल विंचूरकर,पोहेकॉ रविंद्र राजपुत, तसेच रविंद्र सोनवणे, राकेश मोरे कांतीलाल शिरसाठ यांनी हि दमदार कामगिरी केली आहे.
MD TV न्यूज ,धुळे तालुका प्रतिनिधी,दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here