अक्कलकुव्यात जुगार अड्ड्यावर धाड; साडेतेरा लाखाचा मुद्देमाल जप्त

0
788

नंदूरबार :- स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अक्कलकुवा तालुक्यातील पेचरीदेव येथे एका पत्र्याचे शेडलगत मोकळ्या जागेत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यात वाहने, मोबाईल व रोख असा १३ लाख ३९ हजार ५६० रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील पेचरीदेव परिसरात एका पत्र्याच्या शेडलगत सार्वजनिक जागेत झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असताना तेथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तेथे धाड टाकली. यावेळी तेथे १३ जण जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातील सहा मोबाईल ( किंमत – ६१ हजार ५०० रुपये), १८ हजार ६० रुपयाची रोकड, आठ मोटरसायकली ( किंमत २ लाख ६० हजार रुपये), दोन चारचाकी वाहने ( किंमत १० लाख रुपये) असा एकुण १३ लाख ३९ हजार ६६० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ADVERTISEMENT

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रकरणी पोहेकॉ रवींद्र पाडवी यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीसात जयवंत राध्या पाडवी (रा.उदेपुर ता. अक्कलकुवा), सलमान मुसा दावजी (रा.सिदात फलीया गुजरात), संतोषभाई सामाभाई वसावा (रा. सेलंबा गुजरात), राजेश कुंजीलाल कुशवाह (रा. वराछा रोड गुजरात), विनय उर्फ विशाल धरमसिह रबारी (रा. कठोर गुजरात), जयराम उर्फ जयेश बरवाभाई रबारी (रा.अमरोली गुजरात),

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

रफिकभाई देवाभाई अरब (रा. सेलंबा गुजरात), विशाल प्रकाशभाई अध्यारु (रा.विशावगा गुजरात), सलीम अकबर राठोड (रा.अरबटेकडा गुजरात), आमील ईसाक मन्सुरी (रा.सेलंबा गुजरात), प्रित चंदुलाल ठुमर (रा.कडोदरा गुजरात), संजय तडवी (रा.खापर कोराई अ कुवा), इम्रान मकराणी यांच्याविरुद्ध महा. जुगार कायदा कलम १२ (अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि जितेंद्र महाजन हे करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here