शिंदखेडा :६/३/२०२३
तालुक्यात सकाळपासूनच उकाडा जाणवत होता अचानक रात्री झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याची झोप उडवली..
शिंदखेडा तालुक्यातील सुकवत तावखेडा शिवारातील परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झालं, हाता तोंडाचा घास हिरावल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला..
सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सांत्वन करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे सह पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली..
परिस्थितीची पाहणी केली.. नुकसानग्रस्तांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.. शेतकऱ्यांना धीर दिला..
हे हि पहा : नंदुरबारात विविध विकासकामांचं भूमिपूजन
प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करून तहसीलदार अशा गांगुर्डे प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांच्याशी संपर्क साधला. पिकांची त्वरित पाहणी करून पंचनामे करून शासनाकडे पाठपुरावा करावा आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी भावना व्यक्त केली..
मका ,गहू ,पिके ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं त्यात रवींद्र पाटील, बापू पाटील यांच्यासह विविध शेतकऱ्यांचा समावेश आहे..
त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली..
याच पिकांच्या उत्पादनावर पुढील पिकांचे भवितव्य अवलंबून होतं हेही अवकाळी पावसाने हिरावून घेतलं त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला..
यादवराव सावंत प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज शिंदखेडा