तळोदा :- तळोदा तालुक्यातील रापापूर येथे दूपारी अचानक वादळासह बेमोसमी पावसाने अनेक घरांची छपरे उडून गेली. यात घरातील साहित्य, अन्नधान्य याचे मोठे नुकसान झाले आहे. तर शेती पिकाचे नुकसान झाले असून त्वरित पंचनामा करून आदिवासी कुटुंबाना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तळोदा पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत ठाकरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तळोदा तालुक्यातील रापापूर परिसरात आज ( दि २० ) रोजी दुपारी अचानक वादळ वाऱ्यासह पावसाने परिसर जलमय झाला. वादळामूळे शेतकऱ्यांचा अंगणात असलेल्या वस्तू भिजल्या तर काही उडून गेल्या. हवेचा जोर इतका होता की, अनेक घरांची छपरे, घरावरील पत्रे उडून गेले. अंगणात उभ्या केलेल्या मोटरसायकली या दूरपर्यंत फरफटत गेल्या.
एका शेतकरीचे बैल पत्र्याच्या शेडमध्ये होते. ते शेड बैलांच्या अंगावर कोसळले. गावकऱ्यांचा मदतीने बैलांची सूटका करण्यात आली.अनेकांचे छप्पर उडाल्याने घरातील शेतमाल, घर संसाराचा वस्तू भिजून नूकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत ठाकरे यांनी केली आहे.
महेंद्र सूर्यवंशी. एम.डी.टी.व्ही. न्युज तळोदा.