तळोदा /नंदुरबार -५/५/२३
तळोदा : – तळोदा – शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या स्थानिक विकास निधी योजनांतर्गत तालुक्यातील सोमावल बु. येथे अमेरिका व जर्मन अभ्यासक्रमावर आधारित प्रात्यक्षिक अंगणवाडी लोकार्पण संपन्न झाले.
तळोदा तालुक्यातील सोमावळ येथे संपूर्ण जिल्हाभरातील प्रथमच आकारत आलेली तसेच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आधारित असलेली अंगणवाडी. या अंगणवाडीत आलेल्या सर्वच बालकांना अत्याधुनिक टॅब देण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
लोकार्पण कार्यक्रमात संबोधित करताना आमदार पाडवी म्हणाले की, ग्रामीण भागातील लहान मुलांना दर्जेदार शिक्षण व सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रात्यक्षिक मिळाले तर प्राथमिक पाया सुधारित होऊन,शैक्षणिक विकास होईल. अशाच पद्धतीने संपूर्ण मतदारसंघातील अंगणवाडी अमेरिका व जर्मन अभ्यासक्रमावर आधारित केले जातील असे जाहीर केले.
याप्रसंगी सरपंच मिनाश्री वळवी, बाल विकास प्रकल्प अधिकारी रणजित कुऱ्हे यांच्यासह नारायण ठाकरे, विठ्ठल बागले, प्रकाश वळवी, प्रविण वळवी, निलेश वळवी, सानुबाई, अरूण बागले, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
महेंद्र सूर्यवंशी. एम.डी.टी.व्ही. न्युज तळोदा.