आयकर विभागाकडून जनतेवर ४४ हजार कोटींचा दरोडा…

0
113

कोल्हापूर -५/४/२३

आयकर विभागाने देशातील ४४ कोटींहून अधिक पॅन कार्ड ग्राहकांना आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

हा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅन कार्ड धारकाकडून आधार लिंक करण्यासाठी १ हजार रूपयांचा जिझिया कर आकारला आहे. यामुळे देशातील जनतेवर ४४ हजार कोटीचा दरोडा पडणार आहे.

केंद्र सरकारने डिजीटल धोरणाच्या नावाखाली पॅनकार्डधारक व्यक्तींनी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. सदरचा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅनकार्ड धारकास १ हजार रूपये खर्च येत आहे.

यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारून केंद्र सरकार तब्बल ४४ हजार कोटी रूपयाचा दरोडा टाकत आहे.

सध्या जनतेला कोणताही व्यवहार अथवा नोंदणी करत असताना आधार कार्ड व पॅन कार्ड असण बंधनकारक करण्यात आलेला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

केंद्र सरकार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात कराची आकारणी करून वाढलेल्या महागाईच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.

यामुळे या तुघलकी धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी व सर्वसामान्य जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्याकरिता रविवार दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत #स्टॅापरॅाबरी #stoprobbary हा संदेश ट्विटर , फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पाठवायचा आहे. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या nsitharaman@nic.in या मेल वरती सदर धोरणाविरोधात आपल्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत.

सारिका गायकवाड ,प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज कोल्हापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here