राम जन्मला गं सखे…. राम नामानं दुमदुमली नाशिक नगरी..

0
467

नाशिक : ३०/३/२०२३

नाशिकच्या काळाराम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

दुपारी १२ वाजता मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा पार पडला.

यावेळी श्री राम जय राम, जय सीताच्या घोषणाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

तसेच भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात कोदंडधारी श्रीरामाचे सुंदर मंदिर असून तेथे भव्य अशी देखणी रांगोळी साकारण्यात आली होती ..

रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात..

विष्णूचा सातवा अवतार रामाच्या जन्माप्रीत्यर्थ रामनवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला.. ‘रामसे बडा रामका नाम‘, असे म्हटलेलेच आहे.

‘रामाचे एक नाम विष्णुसहस्रनामाच्या बरोबरीचे आहे’, अशी रामनामाची महती साक्षात् शिवाने गायिली आहे. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला, तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. नामजप करतांना त्यातील अर्थाकडे लक्ष देऊन केला, तर तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होते.

यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजपातील शब्दांचा अर्थ समजून घेऊया. ‘श्रीराम‘ हे रामाचे आवाहन आहे. ‘जय राम’ हे स्तुतीवाचक आहे, तर ‘जय जय राम’ हे ‘नमः’ प्रमाणे शरणागतीचे दर्शक आहे.भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात कोदंडधारी श्रीरामाचे सुंदर मंदिर आहे.

या मंदिरात तरुण कोदंडधारी श्रीरामाची मूर्ती स्थापित केलेली आहे.या ठिकाणी मोठ्या संख्येने राम भक्त दर्शनासाठी आल्याचं पाहावयास मिळालं ..

तर हा परिसर प्रभू रामांच्या स्तुती गायनाने सुरमयी झाल्याचं अनुभवास आलं ते या संस्थेतील गायन शिक्षिकांनी सादर केलेली एकाहून एक सरस रामजन्माची गाणी .. ऐकू या त्याची एक झलक ..

01

देशात अशा प्रकारची हि एकमेव मुर्ती असल्याचे सांगितले जाते,

कारण मंदिरामध्ये फ़क्‍त रामाचीच मुर्ती स्थापन करु नये असा दंडक आहे.

या मूर्तीचे वैशिष्ट्य असे कि, येथील भोसला मिलिटरी स्कुलमध्ये प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी उडविलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या रिकाम्या काडतूसाच्या धातुतून ही मुर्ती बनवली असल्याने तिची चकाकी कायम असते

व मुर्तीवरही रासायनिक प्रक्रिया वा इतर परिणाम होत नाही. मूर्तीतून रामाचे लोभसवाणे पण कणखर व्यक्‍तिमत्व साकार होते.

रामाच्या डाव्या हातात धनुष्य, उजव्या हातात बाण व डोक्यावर मुकुट असून प्रत्यंचा सरळ रेषेत ताण दिल्यासारखी बरोबर वाटते.

ही मूर्ती ख्यातनाम शिल्पकार सदाशिव साठे यांनी बनवली आहे. आपण जाणून घेतली प्रतिक्रिया या संस्थेचे सरकार्यवाह श्री. दिलीप बेलगावकर सर यांच्याकडून .. ऐकू या काय म्हणालेत ते ..

02

तर या विशेष असे राम मंदिर आणि भोसला यांचं एक अतूट नातं त्याविषयी स्वानुभव सांगितला तो नाशिक विभागाचे कार्यवाह श्री हेमंत देशपांडे सर यांनी .. ऐकू या नेमक काय म्हणाले …

03

तर भव्य दिव्य अशी हि रामनवमीला अनुसरून काढलेली अप्रतिम रांगोळी आणि त्या मागची नेमकी संकल्पना काय होती ती जाणून घेतली आपण नाशकातील रांगोळी कलाकार सौ आसावरी धर्माधिकारी यांच्याकडून .. ऐकू या काय म्हणालात त्या ..

04

कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी, कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र. हे वस्त्र पाठीपर्यंत असते.) घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात आणि भक्तमंडळी त्यावर गुलाल अन् फुले उधळतात. (काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात.) याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटल जाते ..
या विशेष बातमीसाठी नाशिकहून तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी, एम. डी. टी. व्ही. न्यूज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here