नंदुरबार : १३/३/२३
स्वच्छता ठेवली की, वैभव आपोआपच चालत येत असते. स्वच्छता ईश्वरासमान आहे असे बोलले जाते.
ग्रामस्थांच्या आरोग्याच्या प्रश्न उद्भवू नये हा शुद्ध हेतू मनात बाळगून होळ तर्फे हवेली ग्रामपंचायतीने स्वच्छतेतून समृद्धीकडे गावाला नेण्याच्या संकल्प केलेला असून, रविवारी घंटागाडीचे लोकार्पण व ‘डस्टबिन’ वाटपाच्या शुभारंभ माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी,शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या सहा महिन्यापूर्वी माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना संपर्कप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने नंदुरबार तालुक्यातील होळ तर्फे हवेली ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करीत सत्ता स्थापन केली होती.
रविवारी घंटागाडी व कचराकुंडीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी,शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक रवींद्र पवार, दीपक दिघे,चेतन वळवी, प्रमोद शेवाळे, हंसराज जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव नितीन जगताप, युवासेना तालुकाप्रमुख प्रफुल खैरनार होळ तर्फे हवेली ग्रामपंचायतचे सरपंच मनीष नाईक उपसरपंच शोभा पवार,ग्रामसेवक विजय पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
प्रविण चव्हाण ,जिल्हा प्रतिनिधी ,एम. डी. टी व्ही न्यूज नंदुरबार.