जळगाव -२/४/२०२३
31 मार्च 2023 रोजी कोळगावं ता. भडगाव विर जवान ( फौजी ) आयु. धनराज रमेश केदार हे आपल्या 17 वर्षाची देश सेवा करून रिटायर झालें.
त्यांचे आज कोळगावं येथे आगमन झालें.
त्यांचा रिटायर मेन्टच स्वागत करण्यासाठी कोळगावं येथील जनसमुदाय, परिसरातील देशसेवा करणाऱ्या सैनिकांचे चाहते व सुटीवर घरी आलेले सैनिक, रिटायर झालेले सैनिक, शहीद जावानाच्या पत्नी असे मोठ्या संख्येने जनसमुदाय हजर होता.
त्यांच्या स्वागतासाठी चाळीसगावं येथील जय हिंद सैनिक अकादमी चे संस्थापक, सचिव, सल्लागार उपस्थित होते ..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
गाडी फुल्लांनी व तिरंगा ने सजवलेली गाडीत फौजी धनराज केदार , त्यांची पत्नी, मुले यांना बसवून कोळगावं बस स्टॅन्ड पासून गावात डी. जे.च्या देशभक्तीपर गाण्यावर वाजत गाजत गावात मिरवणूक काढण्यात आली.
भव्य सत्कार गावातील प्रतिष्ठित, त्यांचे मित्र परिवार , आजी, माजी सैनिक , जय हिंद सैनिक अकादमी चे संचालक यांच्या हस्ते करण्यात आला ..
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज…