नंदुरबारात माहिती अधिकार महासंघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

0
154

नंदुरबार :- माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्याहस्ते व राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन यांचे नेतृत्वाखाली नंदुरबार येथे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी माहितीच्या अधिकारबद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे वाहतूक नियंत्रण कक्षाचे उपनिरीक्षक संजय जोने, वाहतुक अधिकारी नितीन परदेशी, वन विभागाचे अधिकारी प्रवीण परदेशी, नगरपालिकेचे अल्ताफ शेख, माजी नगरसेवक रामकृष्ण मोरे, दोशाह ब्लड बँक फौंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आकीब शेख, संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमसिंग वळवी, लताबाई भीमसिंग वळवी, रोहिदास गावित आदी उपस्थित होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ते म्हणाले की, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात अधिकाधिक पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करणे, सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी यासाठी नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या अधिकाराची व्यवहारी शासन पद्धत दाखवून देणे, केंद्रीय व राज्य माहिती आयोग स्थापन करणे, इतर अनुषंगिक बाबी सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामात पारदर्शकता व जबाबदारी वृद्धिंगत करणे, भ्रष्टाचारास प्रतिबंध करणे, लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे, शासन व त्यांच्या यंत्रणा यांना जनतेला जाब देण्यासाठी उत्तरदायी ठरविणे, माहिती मिळवण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना विशिष्ट माहिती पुरवण्याकरता तरतूद प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात अधिकाधिक पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करणे, अशाप्रकारे अनेक माहिती अधिकार कायदा व कलमांबद्दल माहिती दिली.

5d146fdc eb90 46b0 8cc7 78f881ad4e3f

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा, धडगाव ठिकाणाहून आलेले महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमसिंग वळवी यांच्या उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या हस्ते महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सईद कुरेशी यांनी केले. आभार जयेश बागुल यांनी मानले.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here