मुंबई :१/३/२०२३
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अपघातानंतर आता मैदानावर कधी परतणार हे अद्याप सांगणं कठीण आहे.
२०२२ वर्षाचा शेवट हा पंतसाठी खूप वाईट असा ठरला.
पंत त्याच्या कुटुंबियांसोबत नवं वर्ष साजरं करण्यासाठी घरी परत येत होता.
तेव्हा त्याच्या कारचा अपघात झाला.
पंत स्वत: कार चालवत होता आणि रुर्कीजवळ त्याच्या कारचा अपघात झाला होता.
पंत आता बरा होत असून त्याने अपघातानंतर पहिल्यांदा स्वत:चा फोटो शेअर केला आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देताना पंतने म्हटलं की, ‘एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत, एक पाऊल चांगलं.’
पंतने दोन फोटो शेअर केले आहेत. यात तो कुबड्यांच्या सहाय्याने चालताना दिसतोय. पंतच्या पायाला अजून प्लास्टर असल्याचं दिसतंय. ऋषभ पंत यंदाच्या आयपीएल हंगामात खेळू शकणार नाही.
ऋषभ पंतवर अपघातानंतर डेहराडूनमध्ये उपचार करण्यात आले.
त्यानंतर बीसीसीआयने त्याला मुंबईत उपचारासाठी हलवले.
आता पुन्हा मैदानावर परतण्यासाठी पंतला किमान सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो असं म्हटलं जातंय.
अद्याप त्याबाबत काहीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
ब्युरो रिपोर्ट एम डी टी व्ही न्यूज मुंबई