शिरपूर शहरात चोरी, दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार अटकेत | robbery arrested in Shirpur

0
671
robbery arrested

शिरपूर Shirpur: शहर पोलिसांनी एका उत्कृष्ट कामगिरीत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या आरोपींचा शहरात चोरी, दरोडा, ज्वेलरी शॉप फोडणे, एटीएम फोडणे, बँक रॉबरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर शहर पोलिसांच्या शोध पथकाचे कर्मचारी दि. 31 नोव्हेंबरच्या रात्री १:३० वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना शनी मंदिराकडून शिरपूर शहराकडे एका पांढऱ्या रंगाची इको कार येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र कारचालकाने पोलीसांना हुलकावणी देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी कारला सावळदे गावाजवळ थांबवले.

download

कारची तपासणी केली असता त्यात घातक शस्त्रे, तलवार, चाकू, धारदार कटर, लोखंडी कटर, ट्यामी, स्कू चाबी, हातोडा, पेंचीस, पोपट पाना, बॅटरी, मिरची पूड, दोरी व दगड असे साहित्य संशयास्पद रित्या मिळून आले. त्यामुळे आरोपी हे शहरांमध्ये चोरी अथवा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आल्याचे निष्पन्न झाले.

कारमध्ये आढळून आलेल्या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

मुकंदरसिंग निक्कासिंह टाक (वय ३८ रा. बीबी. ता. लोणार जि. बुलढाणा)

तकदीरसिंह टिटूसिंह टाक (वय २४ रा.मंगल बाजार जालना) कलदारसिंग निक्कासिंह टाक (वय ५५ रा. गुरू गोविंद नगर जालना.)

अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यात मिळून आलेली मारुती सुझुकी इको कार क्र. एम.एच ३९ ए.बी ८१९३ हे वाहन देखील श्रेयस कॉलनी तळोदा जिल्हा नंदुरबार येथून चोरी केल्याचे आढळून आले आहे. याबाबत तळोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींवर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरावरील संभाव्य संकट टळले आहे.

या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शिरपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक एस एस आगरकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे व शोध पथकाचे पोहेकॉ, ललित पाटील, पोना, रवींद्र आखडमल, पोकॉ विनोद आखडमल, पोकॉ गोविंद कोळी, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटू साळुंखे, सचिन वाघ, आरीफ तडवी, मनोज महाजन, रोहित राज गांगुर्डे, विवेकराज जाधव, चालक, जितेंद्र मालचे, रवींद्र महाले तसेच होमगार्ड मिथुन पवार, राम भील, चेतन भावसार, शरद पारधी यांच्या पथकाचे अभिनंदन केले जात आहे

राज जाधव शिरपूर तालुका प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here