शिरपूर Shirpur: शहर पोलिसांनी एका उत्कृष्ट कामगिरीत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या आरोपींचा शहरात चोरी, दरोडा, ज्वेलरी शॉप फोडणे, एटीएम फोडणे, बँक रॉबरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर शहर पोलिसांच्या शोध पथकाचे कर्मचारी दि. 31 नोव्हेंबरच्या रात्री १:३० वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना शनी मंदिराकडून शिरपूर शहराकडे एका पांढऱ्या रंगाची इको कार येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र कारचालकाने पोलीसांना हुलकावणी देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी कारला सावळदे गावाजवळ थांबवले.
कारची तपासणी केली असता त्यात घातक शस्त्रे, तलवार, चाकू, धारदार कटर, लोखंडी कटर, ट्यामी, स्कू चाबी, हातोडा, पेंचीस, पोपट पाना, बॅटरी, मिरची पूड, दोरी व दगड असे साहित्य संशयास्पद रित्या मिळून आले. त्यामुळे आरोपी हे शहरांमध्ये चोरी अथवा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आल्याचे निष्पन्न झाले.
कारमध्ये आढळून आलेल्या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
मुकंदरसिंग निक्कासिंह टाक (वय ३८ रा. बीबी. ता. लोणार जि. बुलढाणा)
तकदीरसिंह टिटूसिंह टाक (वय २४ रा.मंगल बाजार जालना) कलदारसिंग निक्कासिंह टाक (वय ५५ रा. गुरू गोविंद नगर जालना.)
- Nandurbar News : अक्कलकुव्यात रात्रीच्या अंधारात दगडफेक; २५ दिवसांपासून नागरिक दहशतीत…!
- Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील ७ हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित; चौथ्या यादीत अवघ्या ४२३ जणांचा समावेश..!
- Thane News Dombivli Sangeet Bhajanotsav Competition: डोंबिवलीत २४ व २५ ऑक्टोबरला भव्य संगीत भजनोत्सव स्पर्धा!
- Nandurbar News MLA Chandrakant Raghuvanshi MSEDCL: दुष्काळात शेतकऱ्यांना ६ तास अखंड वीज द्या; आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी..!
- Nandurbar News Shahada HDFC Bank Fraud: शहाद्यातील बँकेत वृद्धेची ३३ लाखांत फसवणूक; मॅनेजरसह चौघांवर गुन्हा दाखल..!
अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यात मिळून आलेली मारुती सुझुकी इको कार क्र. एम.एच ३९ ए.बी ८१९३ हे वाहन देखील श्रेयस कॉलनी तळोदा जिल्हा नंदुरबार येथून चोरी केल्याचे आढळून आले आहे. याबाबत तळोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींवर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरावरील संभाव्य संकट टळले आहे.
या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शिरपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक एस एस आगरकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे व शोध पथकाचे पोहेकॉ, ललित पाटील, पोना, रवींद्र आखडमल, पोकॉ विनोद आखडमल, पोकॉ गोविंद कोळी, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटू साळुंखे, सचिन वाघ, आरीफ तडवी, मनोज महाजन, रोहित राज गांगुर्डे, विवेकराज जाधव, चालक, जितेंद्र मालचे, रवींद्र महाले तसेच होमगार्ड मिथुन पवार, राम भील, चेतन भावसार, शरद पारधी यांच्या पथकाचे अभिनंदन केले जात आहे
✍राज जाधव शिरपूर तालुका प्रतिनिधी


