कोल्हापूर -३०-३-२३
विटा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचा फ्लेक्स फाडल्याप्रकरणी रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.२९) जाहीर निषेध करण्यात आला. तसेच येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने करून समाजकंटकांना अटक करा, अशा घोषणा देण्यात आल्या.
विट्यातील तासगाव रस्त्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चा फ्लेक्स लावण्यात आला होता. मात्र, मंगळवारी हा फ्लेक्स अज्ञातांनी फाडला.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
हे देखील वाचा:
यावरून रिपाइंचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
त्यांनी ही बाब पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या निदर्शनास आणू दिली होती.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
खरात म्हणाले, विटा शहरामध्ये पक्षाच्या बोर्डाची विटंबना करून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून समाजकंटकास तत्काळ अटक करून कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
सारिका गायकवाड ,कोल्हापूर प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्युज

