मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली मदत

नंदुरबार / साक्री : – धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारातील चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग लागून पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारातील चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग लागून पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहेत. तर एक महिला गंभीररित्या भाजल्याची घटना घडली आहेत.
या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख तसेच मृत, त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदनाही व्यक्त केली आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत तर जखमींवरील उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार / साक्री

