सिन्नर,नाशिक :१५/०२/२०२३
शॉर्ट हेडलाईन
1 वनविभागाच्या बचाव पथकाने वाचवले दोघांचेही जीव
2 सिन्नर तालुक्यातील टेंभुरवाडी येथे घडली घटना
ही घटना आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील टेंभुरवाडी आशापुर येथील.. मांजराच्या पाठीमागे लागलेला बिबट्या मांजरा पाठोपाठ विहिरीत कोसळला..
सावज असलेली मांजर आणि शिकारी असलेल्या बिबट्या रात्रभर विहिरीतील पाण्यात पोहून थकले. विहिरीत असलेल्या लोखंडी अँगल वर पोहून थकलेला बिबट्या विसावला आणि त्याच्या पाठकुळी मांजर बसली. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि मांजर या दोघांचे जीव वाचवले. पाहूया या घटनेची ही क्लिप..
सिन्नर तालुक्यातील टेंभुरवाडी येथे विहिरीच्या पाण्यात पडलेल्या बिबट्याने लोखंडी अँगल चा आधार घेतला आणि बिबट्याच्या पाठकुळी मांजराने ठाण मांडून जीव वाचवला. शेवटी वाघाची मावशीच… बिबट्या व मांजर दोघेही मांजर कुळातील प्राणी.. दोघेही चपळ.. लोखंडी अँगल वर बिबट्या विसरल्यानंतर त्याने मावशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मांजराचा ही जीव वाचवला.
अशी झाली सुटका..
दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत एक जाळी सोडून अगोदर मांजराची सुटका करण्यात आली. त्याने वर काढताच धूम ठोकली. नंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा विहिरीत सोडल्यानंतर बिबट्याने पिंजऱ्यात उडी घेतली आणि दरवाजा बंद झाला. त्यानंतर अडीच ते तीन वर्षांच्या मादीला उपचारांसाठी सिन्नर जवळील मोहदरी वन उद्यानात आणण्यात आलं. बिबट्या सुमारे 70 फूट खोल विहिरीत पडला. विहिरीत सुमारे 50 फूट पाणी होते. त्यामुळे दोघेजण विहिरीत रात्रभर पोहत आपला जीव वाचवत राहिले.
रहिवाशांना विहिरीतून बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकू आला. त्यांनी डोकावून पाहिल्यानंतर त्यांना लोखंडी अँगल वर बिबट्या बसलेला दिसला. त्यांनी ताबडतोब वनविभागाला याची माहिती दिली. सिन्नरच्या वन विभागाने तातडीने बचाव कार्य सुरू केलं. आणि अखेर दोघांचा जीव वाचला..
तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक