साक्री/धुळे -२/५/२३
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती ची पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी दि 30 रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.
या निवडणुकीत भाजपाचे दोन गट प्रतिस्पर्धी म्हणून लढत होते.
निवडणुकीत 18 पैकी 16 जागांवर विजय प्राप्त करून बळीराजा विकास पॅनलने एकहाती सत्ता मिळवली. माजी जि प अध्यक्ष शिवाजीराव दहिते, माजी खासदार बापू चौरे, जि प सभापती हर्षवर्धन दहिते ,मा.स विशाल देसले यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा विकास पॅनलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार व दहिते गटाच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.



साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शहरातील न्यू इंग्लिश स्कूल येथे रविवारी दि 30 रोजी सकाळी 8 वाजेपासून मतदान करण्यास सुरुवात झाली.
एकूण 13 मतदान केंद्रात मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण 5 हजार दोनशे 33 मतदारांची संख्या असून एकूण 4 हजार तीनशे 29 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष मतदार 3 हजार एकशे 72 तर महिला मतदार 1 हजार एकशे 57 असे आहेत. एकूण 82.72 तक्के मतदान झाले.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी प्रक्रियेस कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सायंकाळी पाच वाजेपासून सुरुवात करण्यात आली. मतमोजणी साठी एकूण नऊ टेबल लावण्यात आले होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
https://bit.ly/3UoK7E0
मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
निवडणूक निर्णय अधिकारी संजय गीते, विजय वडांगे यांच्यासह निवडणूक विभागातील कर्मचारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव अशोक मोरे, धीरज गावित आदींसह कर्मचारी यांनी सहाय्य केले.
शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व आमदार सौ. मंजुळा गावित, सुरेश रामराव पाटील, सुरेश सोनवणे, उत्तमराव देसले, पोपटराव सोनवणे, इंजी.मोहन सूर्यवंशी, ऍड नरेंद्र मराठे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले.
तर बळीराजा विकास पॅनलचे नेतृत्व माजी जि प अध्यक्ष शिवाजीराव दहिते, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी एस अहिरे, जि प सभापती हर्षवर्धन दहिते, शिवसेनेचे विशाल देसले, माजी आमदार वसंतराव सूर्यवंशी, के.टी. सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, माजी जि.प.सदस्य विजय ठाकरे,जि.प.सदस्य दिलीप काकुस्ते, प्रभाकर बच्छाव, प्रदीप नांद्रे ,माजी सदस्य उत्पल नांद्रे,लक्ष्मीकांत शाहा,आबासाहेब सोनवणे, मुन्ना देवरे, रमेश सरक सुधीर अकलाडे प्रवीण देवरे ,नितीन साळुंखे, ऋषिकेश मराठे बबलू नांद्रे, बाळा खैरनार, काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे ,दिलीप काकुस्ते, नगरसेवक दीपक वाघ, जितूबाबा सोनवणे, विनोद पगारिया ,धनराज चौधरी आदींनी केले.
यात बळीराजा विकास पॅनल ला मतदारांनी बहुमत प्राप्त करून दिले..
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे-
सेवा सहकारी संस्था मतदार संघ ( सर्वसाधारण ) संचालकांचे नाव व मिळालेली मते-
1) शाईराम नाना अहिरे ( 457 ),
2) नंदकुमार अभिमान खैरनार ( 469 ),
3) लादुसिंग सुरतसिंग गिरासे ( 447 ),
4) ऋतुराज विजयकुमार ठाकरे ( 474 ),
5) भानुदास रामदास गांगुर्डे ( 456 ),
6) बन्सीलाल वामन बाविस्कर ( 427 ),
7) दीपक पोपटराव साळुंके ( 438 ),
सेवा सहकारी संस्था मतदारसंघ (अनुसूचित जमाती )
8) वसंत तुळशीराम पवार ( 598 ),
9) रवींद्र पोपटराव ठाकरे ( 545 ),
सेवा सहकारी संस्था मतदारसंघ (महिला राखीव )
10) कलाबाई यशवंत बेडसे ( 545 ),
11) जिजाबाई संजय साबळे ( 523 ),
ग्रामपंचायत (सर्वसाधारण )
12) मुकुंदराव केशव घरटे ( 708 ),
13) जितेंद्र हिम्मतराव बिरारीस ( 776 ),
ग्रामपंचायत (अनुसूचित जाती -जमाती )
14) ओंकार दाज्या राऊत ( 782 ),
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक
15) भास्कर गजमल पवार ( 764 ),
व्यापारी व आडते
16) किरण उद्धव कोठावदे ( 1085 ),
17) राजेंद्र बिहारीलाल शहा ( 903 ),
हमाल व तोलारी मतदारसंघ
18) दिनकर सोनू बागुल ( 258 ),
जितेंद्र जगदाळे ,साक्री प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज