नेर : साक्री येथील श्रीमती विमलबाई उत्तमराव पाटील कला व कै. डॉ.भास्कर सदाशिव देसले विज्ञान महाविद्यालय येथे त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.डॉ.भास्कर देसले यांची २२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी देसले हॉस्पिटल साक्री येथे नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. त्या शिबिराचा ३०० पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला.
या प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी श्रीमती मंगलाताई देसले, संस्थेच्या सदस्य डॉ. श्रुतिका देसले, प्राचार्य.पी.एस.सोनवणे, डॉ.गोसावी, डॉ.स्वप्निल भदाणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ विजय देसले यांनी केले. प्राचार्य सोनवणे यांनी बाबांनी केलेल्या कार्याच्या स्मृतींना उजाळा दिला. पन्नास वर्षांपूर्वी जनरल सर्जन म्हणून साक्री सारख्या ग्रामीण भागात राहुन जनतेची सेवा केली, याबद्दल धन्यता व्यक्त केली. त्या काळामध्ये मुंबई, पुणे सारख्या शहरात त्यांनी जर आपला डॉक्टरकीचा व्यवसाय केला असता तर त्यांनी खोऱ्याने पैसे गोळा केला असता परंतु, त्यांनी तसे न करता आपल्या तालुक्यातील लोकांसाठी सेवा दिली ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे असे मत व्यक्त केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी देसले हॉस्पिटल साक्री येथे नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. त्या शिबिराचा ३०० पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरात डॉ, मंगला देसले, डॉ.श्रुतिका देसले (नेत्ररोग तज्ञ), डॉ.गोसावी, डॉ. भदाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, गुरुवर्य गोलवलकर प्राथमिक शाळा येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, देसले हॉस्पिटल मधील समस्त कर्मचारी उपस्थित होते.
दिलीप साळुंखे, एम.डी.टी.व्ही. न्युज नेर, ता.साक्री.