साक्री /धुळे -२१/७/२३
साक्री येथील त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे श्रीमती विमलबाई उत्तमराव पाटील कला व कै. डॉ.भास्कर सदाशिव देसले विज्ञान महाविद्यालय साक्री येथे नॅक समितीच्या मूल्यांकनानंतर बी प्लस(B+) ग्रेड प्राप्त झाली. महाविद्यालयात दिनांक ४ व ५ जुलै 2023 ला आंध्र प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नागेश्वर गोलापल्ली पश्चिम बंगाल येथील डॉ.सरबजीत सेन गुप्ता व चेन्नई येथील महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.हनीफा घोष या नॅक समितीच्या शिष्टमंडळाने भेट दिली.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तसेच प्रथमत महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.पी.एस.सोनवणे यांच्याशी मीटिंग झाल्यावर समितीने महाविद्यालयातील कार्यालयाची तेथील कागदपत्रांची पाहणी व चौकशी केली.त्यानंतर महाविद्यालयातील सर्व विषयानुसार विभागांची पाहणी केली,प्राध्यापकांशी त्याविषयी संवाद साधला.त्यानंतर ग्रंथालय,राष्ट्रीय सेवा योजना,क्रीडा विभाग,युवती सभा,विद्यार्थी विकास विभाग यातील कार्यक्रमांची पाहणी करून नोंद घेतली.तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी,नियमित विद्यार्थी व पालक वर्ग यांच्याशी संवाद साधला आणि महाविद्यालयाच्या सचिव .मंगला देसले,संस्थेच्या अध्यक्ष मा.मृणाल देसले व संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.अजिंक्य देसले यांच्याशीही मुक्त चर्चा केली व समाधान व्यक्त केले. त्यानंतर दिनांक ५ जुलै 2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजना व मालपुर ग्रामपंचायत यांच्या योगदानाने सुरू असलेल्या रामनगर या दत्तक गावात समितीने भेट दिली
तेथील वृक्षारोपण,बिजारोपण,सीडबॉल पाहून कौतुक केले.महाविद्यालयात प्राध्यापकांशी समितीने समारोपप्रसंगी संवाद साधला त्या प्रसंगी त्यांनी समूहाने केलेल्या कामाचे फळ निश्चित चांगलेच मिळत असते असे नमूद करून पुढील नॅकसाठी आजपासूनच आपण कार्यप्रवृत व्हावे असे सुचित केले व पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे नॅक समितीच्या झालेल्या सर्वेक्षण व मूल्यांकनानुसार महाविद्यालयास बी प्लस ग्रेड मिळाली त्याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ. मंगला देसले ,संस्थेच्या अध्यक्ष .मृणाल देसले संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य देसले व संस्थेच्या संचालिका मा. डॉ.श्रुतिका देसले यांनी महाविद्यालयातील प्राचार्य मा.डॉ.पी.एस.सोनवणे ,सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तसेच कौतुकही केले .. महाविद्यालयातील प्राचार्य मा.डॉ.पी. एस.सोनवणे यांनी देखील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याचे कौतुक करून पुढील उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
दिलीप साळुंखे ,धुळे प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ..