नंदुरबार – ३०/३/२३
जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या तीन दिवसात ३७६ अर्जाची विक्री झाली असून दोन गटात प्रमुख लढत होण्याची शक्यता असली तरी निवडणूक लढविणाऱ्याची भाऊगर्दी होणार आहे.
निवडणूक आयोगाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सहा बाजार समितींअंतर्गत सहकार क्षेत्रात अस्तित्वासाठी नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
दरम्यान, काल तिसऱ्या दिवसाअखेरपर्यंत सहा बाजार समितींसाठी एकूण ३७६ अर्जांची विक्री झाली होती.
बाजार समितींवर प्रशासकराज असल्याने नेमक्या निवडणूका जाहीर होणार कधी? याकडे लक्ष लागून होते. यामुळे गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने निवडणूका जाहीर केल्यानंतर सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापले आहे. नेत्यांकडून बैठकांचे सत्र सुरु झाले आहे.
सहकार क्षेत्रात अस्तित्वासाठी राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर इच्छूकांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत असून रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र सुरु आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा व नंदुरबार या सहा कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे. त्यानुसार दि.२७ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत नामांकन अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याअंतर्गत दि.२७, २८ व काल २९ मार्च या तीन दिवसात सहा बाजार समितींसाठी ३७६ अर्जांची विक्री झाली आहे.
यामध्ये धडगाव १८, शहादा १०२, नवापूर ५८, तळोदा ८१, अक्कलकुवा ३६ तर नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ८१ अर्जांची विक्री झाली आहे.
३ एप्रिलपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत. इच्छूकांकडून अर्जांची खरेदी करण्यात आली असून नेत्यांच्या आदेशानुसार नामांकने दाखल करता येणार आहे. तर काही इच्छूकांकडून आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु आहे.
जीवन पाटील,कार्यकारी संपादक ,एम. डी. टी. व्ही. न्यूज,नंदुरबार