आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी धुळे ते मुंबई मंत्रालय पर्यंत संघर्ष पदयात्रा…!

0
563
Sangharsh Padayatra from Dhule to Mumbai Mantralaya for the justice rights of tribals and farmers...!

आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर आदिवासी समाजावर होत असलेल्या महाराष्ट्र शासनाकडून अन्यायाला वाचा फोडून न्याय व हक्कासाठी दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ठिक १० :०० वाजता धुळे येथील एकविरा देवी मंदिरापासून तर मुंबई मंत्रालय पर्यंत संघर्ष पदयात्रा मोर्चा संदर्भात  दिनांक २/१०/२०२३ वार सोमवार रोजी दुपारी १२:०० वाजेपासून तर सलग ३:०० वाजेपर्यंत हि बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील अनेक टोकरे कोळी, महादेव कोळी,मल्हार कोळी जमातीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते व त्यांनी आप आपले मनोगत व्यक्त करताना नितीन आखडमल यांनी सांगितले की महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी व इतर आदिवासींसाठी फक्त शानाभाऊ सोनवणेच आंदोलन करु शकतात त्यासाठी मी स्वतः संपूर्ण शिरपुर तालुक्यातील समाज बांधवांपर्यंत जाऊन मोर्चा संदर्भात बैठका घेऊन जनजागृती करणार.

WhatsApp Image 2023 10 05 at 4.55.01 PM

त्यावर हेमंत सुर्यवंशी यांनी देखील सांगितले की मी पण नंदुरबार तालुका व शहादा तालुक्यातील समाज बांधवांपर्यंत जाऊन मोर्चा संदर्भात बैठका घेऊन जनजागृती करणार नंतर मनोहर वाघ यांनी सांगितले की मी या आंदोलनात सहभागी होणार तसेच जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव बाविस्कर व नंदुरबार जिल्ह्यातील भास्कर कुवर व विजय शिंदे यांनी देखील पायी मोर्चा संदर्भात काही सूचना दिल्यात व रस्त्याने जाताना सुचणांचे पालन करुन मुंबई मंत्रालय पर्यंत आपला पायी मोर्चा यशस्वी करण्यासाठी माहीती देऊन सर्व आदिवासी टोकरे कोळी ,महादेव कोळी ,मल्हार कोळी समाज बांधवांनी आपल्या मुलांच्या व परीवाराच्या तसेच समाजाच्या हितासाठी सर्व संघटना बाजूला सारुन फक्त आणि फक्त टोकरे कोळी ,महादेव कोळी ,मल्हार कोळी जमातीवर होत असलेल्या अन्याया विरुद्ध हा पायी मोर्चा काढला जाईल.

व सर्व एकत्रित येऊन यशस्वी करु अशे आश्वासन दिले त्यानंतर शानाभाऊ सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले की महाराष्ट्र राज्यातील सगळे गॅझेट आपल्या बाजूने आहेत शासनाची अधिकृत प्रकाशाने, इम्पीरियल डाटा आणि जिल्हा गॅझेट प्रख्यात मानवंशशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ दुर्मिळ ग्रंथ, डेसिनिअल जनगणना अहवाल ,संदर्भ पुस्तके हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाचे निकाल असे अनेक पुरावे आहेत जे आपल्या बाजूने आहेत टोकरे कोळी, महादेव कोळी,मल्हार कोळी च्या जुन्या नोंदी बर्यापैकी आहेत . सुप्रीम कोर्टाचे इंदिरा स्वामी व मिलिंद कटवारे ह्या केसेस सुध्दा आपल्या बाजूने आहेत त्यासाठी मी आदिवासी जमातीचे २२ आमदार, ४ खासदार व प्रधान सचिव यांच्या सोबत बैठक लावावी येवढे पुरावे आपल्या बाजूने आहेत म्हणून आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही.

१००% पुर्ण बाजु आपल्या बाजूने आहे म्हणून मी आश्वासन देतो की समाजाला न्याय मिळणारच म्हणून ह्या मोर्चाला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहुन आम्हाला आशिर्वाद दयावा सगळ्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन दिले हा मोर्चा सर्व संघटनांनी मतभेद विसरून एकत्र आलेले आहेत सगळ्यानी आशिर्वाद दयावा व आर्थिक मदत करुन सहकार्य करावे व मोर्चात सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे मनोमन व्यक्त केले त्याचबरोबर त्यांनी सांगितले.

की पहिल्या दिवशी ज्याना मोर्च्यात सहभागी होता आले नाही त्यानी दुसऱ्या दिवशी किंवा हा मोर्चा एकविरा देवी देवपुर धुळे मंदिरापासून तर मुंबई मंत्रालय पर्यंत १२ दिवस लागतील तर मध्ये कुठे तरी १२ दिवसांच्या आत सहभागी झालात तरी चालेल ज्यांना शक्य झाले नाही त्यानी आपापल्या गावात मंदीरावरती किंवा मा. जिल्हाधिकारी कार्यालय, मा तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करावे व फक्त एक वेळा सर्व समाज एकत्र येऊन लाखोंच्या संख्येने या १७/११/२०२३ च्या मोर्चात सहभागी व्हा आपले प्रश्न सुटल्याशिवार राहणार ह्या शब्दात त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्यावेळी गुजरात राज्यातील उबद येथील रहिवासी सागरभाऊ बागुल हे व्यवसायासाठी सध्या साऊथ आफ्रिका येथे वास्तव्य करत आहेत त्यांना बैठकिचे कळाल्यावर ते देखील बैठकीत उपस्थित होते व त्यांनी सांगितले की मला गर्व आहे की मी कोळी जमातीचा आहे व पुढे हे देखील सांगितले की खान्देशातील टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी जमातीवरील अन्याय दुर करायचा असेल तर प्रत्येक घरातील एक व्यक्तीने या पायी मोर्च्यात सहभागी व्हायला हवे त्यासाठी त्यांनी या पायी मोर्चा साठी रक्कम रुपये ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली त्यावेळी आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी जमातीचे शानाभाऊ सोनवणे,सागर बागुल गुलाब बाविस्कर, भास्कर कुवर,हेमंत सूर्यवंशी,विजय शिंदे सह धुळे,नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील अनेक टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते…

सारंगखेडा प्रतिनिधी.(गणेश कुवर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here