येथील इच्छापूर्ती साईबाबा मंदिरात चोरट्यांनी दानपेटी पळवली .. भर दुपारी झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली .. ६० ते ६५ हजार रुपये दानपेटीत असल्याचे सांगण्यात आले .. सारंगखेडा तापी नदी काठावर साई भक्तांनी असे भव्य दिव्य मंदिर उभारले आहे.. या मंदिरात बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरून नेल्याची घटना दुपारी १ ते ४ च्या दरम्यान घडली .
साई मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी हि माहिती पोलिसांना दिली.. दुपारी मंदिरात पुजारी १ वाजेपर्यंत उपस्थित होते . सायंकाळी काही भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी आले . त्यांना हि बाब लक्षात आल्यावर पोलीस निरीक्षक कैलास वाघ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले .. नदीकाठी स्मशानभूमीजवळ दानपेटी तोडून फेकल्याचे आढळले .. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते ..
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
आता पर्यंत चोरीच्या घटना घडत असून सारंगखेडा पोलिसांकडून अद्यापही मागील घटनेतील आरोपींची अटक झाली नसून या चोरट्यांनी मंदिरांवरचं डल्ला मारण्याचा प्रयत्न केलाय .. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर आणि शोध मोहिमेवर नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जातोय ? या चोरट्यांची मुसक्या आवळण्यात त्यांना यश येईल का ? नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरु आहे हेच उत्तर सारंगखेडावासियांना ऐकायला मिळेल ? अहो वाघ साहेब, आता तुम्ही डरकाळी फोडा ,चोरट्यांना पकडा .. !
संजय मोहितेंसह जगन ठाकरे, शहादा प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार