कजगाव येथे ऊष्माघाताचा दुसरा बळी….सावधान : उष्माघातापासून मुलांना जपा ..

0
321

कजगाव -१८/५/२३

कजगाव येथे उष्मघाताचा दुसरा बळी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे
दिवसेंदिवस उन्हाचे तापमान प्रचंड मोठ्या प्रमाणावर गेले आहे.
उन्हाचा पारा ४५ अंशा पर्यंत जाऊन पोहचला आहे.
त्यामुळे उष्मघाताचे प्रमाणही वाढले आहे

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
कजगाव येथे चार दिवसात उष्मघाताचे दोन बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चार दिवसात दोन बळी गेल्याने कजगाव परीसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
विराट गोपीचंद मालचे ह्या आठ वर्षीय बालकाचा उष्म घाताने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विराट हा दिनांक १५ रोजी संध्याकाळी पर्यंत खेळत होता
मात्र संध्याकाळी अचानक त्याला उलट्या व अस्वस्थ वाटू लागले
त्यामुळे दिनांक १६ रोजी त्याला चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले
मात्र डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे दाखल करण्याचा सल्ला दिला
मात्र धुळे येथे घेऊन जात असतांनाच त्याचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला
अगदी आठ वर्षाच्या बाळाचा अश्या पद्धतीने दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे कजगाव गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे
हस्त्याखेळत्या मुलाचा असा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबाने व नातेवाईकांनि हृदय हेलावून टाकणारा आक्रोश केला आहे.
कष्टकरी आदिवासी कुटूंबातील बालकाचे असे अचानक जाण्याने समाजमन पुरते सुन्न झाले आहे.
मागील चार दिवसांपूर्वी अक्षय सोनार ह्या एकोणतीस वर्षीय तरुणाचा मृत्यूला काही कालावधी लोटत नाही तोच एका बालकाचा मृत्यू झाल्याने कजगाव परीसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
एकामागून एक असे दोन बळी गेल्याने नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे.
मयत विराटच्या पश्चात आई,वडील,एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे
त्याच्यावर रात्री आठ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
निलेश पाटील ,प्रतिनिधी ,कजगाव तालुका भडगाव ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here